भारतीय पद्धतीने पाककृती सातत्याने करत राहणे म्हणजे एक आनंददायी आव्हानच आहे. कारणं अनेक आहेत, अनेकविध सामग्रीने तय्यार केलेले पदार्थ, त्यात देखील कृतूनुसार, सणावारानुसार, तब्येतीला साजेस असं सगळं तयार करणं, त्याची तय्यारी, मांडणी, प्रत्यक्ष कृती आणि त्यानंतर आवरासावर. माझ्या दृष्टीने स्वयंपाकाचा अंदाज जास्त महत्वाचा. अर्थात सढळ हाताने केलं कि उरतच. उरलं कि मज्जा येते म्हणावं कारण तेव्हाच तर फोडणीचा भात, पोळीचा चिवडा, थालीपीठ ई. पदार्थ चाखायला मिळतात आणि ते प्रचंड चविष्ट लागतात. गोळाबेरीज काय तर स्वयंपाक करणे म्हणजे सातत्याने व्यग्र राहणे. कदाचित मुलींच्या / स्त्री वर्गाच्या स्वभावात तो प्रेमळपणा, आपुलकी आणि शांतात असते म्हणून हे क्षेत्र त्यांच्या स्वाधीन केलं गेलं होत अनेक पिढ्यांपूर्वी. पण आता थोडीशी परिस्थती वेगळी आहे. प्रवाह पतित होणं गरजेचं. अनेक मुलांना आवड म्हणून किंवा अजून काही कारणास्तव रोजचा स्वयंपाक करायला आवडतो, किंबहुना आवडीने ते करतात. पण माझ्या दृष्टीने ते फारच अप्रूप आहे, सोप्प नाही आहे आणि त्यात विविधता + साग्रसंगीत, मग काय विचारात. अश्याच एका अवलियाची भेट झाली माझी काही दिवसांपूर्वी आणि समजलं कि गेली अनेक वर्ष ते एकटे स्वतः सगळं करतात आणि गाणं म्हणत / गुणगुणत त्या संपूर्ण प्रोसेस चा आनंद घेत आहेत. ते स्वतः एका आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालयातील संस्थेचे संचालक आहेत, विश्वविद्यालयाच्या प्रचंड जबाबदाऱ्या सांभाळत शिवाय दररोजचा स्वयंपाक तो देखील वैविध्यतेने नटलेला, पौष्टिक आणि त्यावर गाण्याचा साज, आणि तेही नसे थोडके म्हणून सणासुदीला समविचारी शेजाऱ्यांना आग्रहाचं निमंत्रण, मी तर निःशब्दच झाले.
त्यातच त्यांच्या हाताच्या उत्कृष्ट चवीच्या पदार्थांचा फडशा पाडतांना अजुनक एक गुपित समजलं ह्या त्यांच्या स्वयंपाक करण्याच्या आवडी मागचं. ते म्हणजे त्यांच्या मॅडम ची आई फार लवकर गेल्यामुळे लग्न झाल्यावर तिला माहेरपण उपभोगता आलं नाही. त्यामुळे सरांनी जणू काही विडाच उचलला आणि गेले अनेक वर्ष सर मॅडम ना माहेरची उणीव भासू देत नाहीत. उत्साहाने सगळं आळीपाळीने खाऊ घालतात सातत्याने.
अशीच सर्वांनी मनापासून सगळं करण्याची तय्यारी दर्शवली आणि कृतीत आणली तर प्रत्येकाची भरभराट होणार हे नक्की. यशाचा मार्ग म्हणे पोटातून जातो, मग आवडेल ते स्वतः करून खा, खाऊ घाला आणि समाधानाने, उत्साहाने कामाला लागा, यश निश्चित तुमचंच आहे. खूप काही शिकायला मिळालं आहे, मिळतं आहे ह्या संचालक सरांकडून. धन्य ते सर आणि त्यांची रोजनिशी.
सोमवार, १८ ऑक्टोबर, २०२१
स्वयंपाक
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा