शुक्रवार, १० डिसेंबर, २०२१

माया

ह्या अत्यंत प्रिय, छोटेखानी आणि गोंडस शब्दांचे अनेक अर्थ आहेत मराठी भाषेत, अर्थात जसं वापरू तस्स. हाच शब्द नाही तर बाकी इतर बरेच शब्द आणि भाषा अश्याच असतात, ती खासियत आहे भाषेची, नाही का? तर आज मी येथे मला उमगलेले आणि प्रचलित असलेले अर्थ / मतितार्थ येथे मांडते आहे. माया म्हणजे प्रेम, माया म्हणजे प्रेमळ किंवा काळजी आई सारखी, माया म्हणजे कदाचित मऊ असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

माझ्या कानावर अनेकदा पडलेले एक वाक्य असे कि जर एखादा ड्रेस किंवा ब्लॉउज थोडं घट्ट झालं (कापड असल्यामुळे किंवा वजन वाढल्यामुळे) तर त्याला पट्टाकिनी उलट-सुलट करून तपासलं जातं "माया आहे का?" हे म्हणत. अर्थात खूपच आधीपासून हा वाक्प्रचार कानावर पडल्यामुळे असेल मी हा एक अर्थ आपसूक मान्य देखील केला. फारच मजेशीर अर्थ आहे पण आहे. माया असणं म्हणजे जास्तीची शिवण, किंवा शिल्लक / जास्तीचं कापड / जागा ई. माया म्हणजे एका पेक्षा जास्त मुद्दाम दिलेल्या शिवणी. त्यातली सर्वात आतली उसवली कि जास्तीची जागा तय्यार होते आणि जो ड्रेस घट्ट होत असतो त्यात सहज मावलं जातं. मायेने तोच आवडीचा ड्रेस पुन्हा परिधान करता येतो / मिरवता येत. हि माया शिवतांनाच विचारपूर्वक आणि अर्थात जास्त कापड असेल तर निश्चित राखीव ठेवली जाते. टेलर ला शांतपणा आणि आनंद घेत शिवता आलं तर २-३ शिवणी आधीच मारून ठेवल्या जातात, प्रेमापोटी, पैसा वसूल अश्या पद्धतीने.

महागडे कपडे हे फक्त सूत नसून प्रचंड आठवणी, आशीर्वाद आणि आपुलकी असते. ती अनेक वर्ष टिकावी म्हणून माया फार महत्वाची, नाही का? तर अशी हि माया, अदृश्य पण अत्यंत उपयोगी. आताशा रेडिमेड च्या जमान्यात पण माया टिकून राहावी नावीन्याने हे अपेक्षा. नवीन पिढीला पोट धरून नक्की हसू येईल ह्या मायेबद्दल ऐकून हे निश्चित. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...