मंगळवार, ७ डिसेंबर, २०२१

दिल से दिल तक

ऑफिस च्या कामाच्या निमित्याने मी नागपुरच्या वास्तव्यात विविध लोकांना, माझ्या आप्तस्वकियांना भेटायचं ठरवलं आणि ते हळू हळू सुरू केलं देखील. प्रत्येक वेळी कोणाच्याही घरी जाते वेळी मी हल्दीराम चे विविध पदार्थ घेतले. असेच मागल्या रविवारी एकांकडे जाते वेळी हल्दीराम च्या काही वस्तू ऑर्डर करतांना माझ्या साठी चाऊ-म्याऊ पण मागवलं. एक प्रकारची भुजिया होती आणि नवीन वाटली म्हटलं खाऊन बघावं आणि मला नेहेमीच असं नवनवीन चाखायला आवडत, प्रचंड. झालं काही वेळात आला  कि तो माणूस डिलिव्हरी करायला. मी ते सगळे सामान बघून थोडी अवाक झाले, म्हटलं माझंच सामान आहे ना? कारण मी भुजिया ऑर्डर केली होती आणि ती एका छोट्याश्या पिशवी वजा पॅकिंग मध्ये येणार हि अपेक्षा होती नेहेमी प्रमाणे. पण काय सुखद छोटंस आश्चर्य, एक सुबक सुंदर देखणा डब्बा आला. नीट बघितलं तर तीच भुजिया, उघडून बघितलं तर त्यात एक विचारपूर्वक पॅक केलेलं पाकिट. काय आनंद झाला मला डब्बा + पाकीट हि अपेक्षाच नव्हतीच. एकदा पाकीट उघडलं कि कुठे काढून ठेवायचं हा यक्ष प्रश्न आणि रबर बँड्स लावले तरी सरदतात पदार्थ. त्यामुळे काही का असेना, हल्दीराम ने ह्या डब्याचे पैसे माझ्याच कडून जरी घेतले असले तरी माझी झालेली सोय मला जास्त भावली. ज्यांनी कोणी हा विचार केला आहे, ज्याच्या कोणाच्या डोक्यातून हि कल्पना सुचली आहे त्यांना प्रणाम. हलका, द्यायचा म्हणून, नाजूक, कमकुवत असा डब्बा नाही बरं का तो. ती भुजिया मटकी वापरून तय्यार केली आहे, अतिशय पौष्टिक अशी आहे, डब्बा दणकट आणि नाव त्याहून जगावेगळं "करोडपती भुजिया". एकंदरीत भावलेलं प्रॉडक्ट आणि प्रचंड औत्सुक्ययुक्त आनंद देऊन गेलेलं असं. शेव ह्या प्रकारातलं अनोखं असं नवखं पॅकिंग "दिल से दिल तक" पोचणार असं. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...