शनिवार, ११ डिसेंबर, २०२१

हात हलवत येणे

"वाक्यात प्रयोग करा" अश्या पद्धतीचे प्रश्न आम्हाला शाळेत विचारले जात असत प्रश्न पत्रिकेमधे. आम्ही असंख्य शब्दांचे आणि म्हणींचे वाक्य तय्यार ठेवत असू त्या प्रश्नाचं चोख उत्तर द्यायला. तेव्हा हे वाक्य होत कि नाही माहित नाही पण हि एक म्हणण्याची पद्धत आहे किंवा निरीक्षण आहे.

आज आमच्या नवीन कॉलेज चा प्रत्यक्ष्य वर्ग भरण्याचा पहिलाच दिवस. विद्यार्थी माझ्या मते साधारणतः दोन एक वर्षांनी आली महाविद्यालयात आणि वर्गात शिकवण्याचा थोडक्यात आनंद मिळाला. थोडक्यात ह्याच्या साठी कि अर्धे विद्यार्थी घरी होते आणि बाकी माझ्या डोळ्यादेखत. सर्व प्रथम जी मुलगी आली क्लास अटेंड करायला ती फक्त आली आणि तीच आली हो, महद आश्चर्य वाटलं मला, हात हलवत, काहीही म्हणजे काहीही नाही सोबत. जगावेगळा भरोसा त्या मोबाईल वर. शिकायला आलो म्हणजे विद्यार्थी होण्याचे काही चिन्ह नको, एखादी सुंदरशी बॅग, त्यात टिपायला काही पेन, कागद ई. त्या महामानवाला लागेल तर चार्ज करण्यासाठी चार्जर, तहान लागली रस्त्यात किंवा कुठेही तर छोटेखानी पाण्याची बाटली, स्वतःला किंवा मित्र मैत्रिणींना भूक पण लागू शकते, तेव्हा थोडासा खाऊ, पैस्याचे अँप चालले नाही तर थोडीशी सोय... काहीही म्हणजे काहीही नाही. मला नाही पटलं आणि म्हणून हा पंक्ती प्रपंच. आणि त्यातल्त्यात ती घरून आली होती, मग घरचे काही म्हटले नसतील? "जो दुसऱ्यावरी विसावला त्याचा कार्य भाग बुडाला" असं ऐकलं आहे मी, मग जाणंयेण्यासाठी अँप वर, भुकेसाठी कॅन्टीन वर आणि शिक्षणासाठी मोबाईल वर का संपूर्णपणे अवलंबून राहायचं? आणि जरी भेदभाव नको ठेवायला पण तरी देखील मुलगी म्हटली म्हणजे अजून काही वस्तू ठेवाव्याच लागतात, कधी गरज पडेल सांगता येत नाही. ह्या उपर तिच्या नंतर जे सगळे मुलं वर्गात आले त्यांच्या कडे त्यांची शिस्तीत बॅग होती. असो, शाळेत असतांना काही शब्द वापरून एक वाक्य लिहावं लागत असे पूर्ण मार्क मिळवण्यासाठी.  आणि आता मस्त छोटेखानी पण हवी तशी अनुकथा उभी करता आली. क्या बात है? ती हात हलवत आली आज पण मला ह्या कथेसाठी विषय देऊन गेली.   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...