शनिवार, ११ डिसेंबर, २०२१

नाण्याची दुसरी भक्कम बाजू

आज सकाळी माझी ध्यानसाधना आटोपल्यावर एकांसोबत फोन वर बोलणं झालं. फोन च्या संपूर्ण संवादात त्यांचा एक विशिष्ट सूर लागला होता. तो थोडासा काय प्रचंड नाराजीचा होता. आता ते आहेत जेष्ठ नागरिक. त्यामुळे वाढत्या वयोमानानुसार आपल्याला नको असलं / किंबहुना आवडत नसलं, तब्येत ठणठणीत असली  तरी देखील आरोग्य विम्याचे पैसे वाढतातच, काहीही तरणोपाय नाहीच. त्यांच्या म्हणण्यानुसार मागल्या वर्षीपेक्षा साधारणतः दुप्पट भरावे लागले ह्या वर्षी असं  काहीतरी. सूर इतका तारसप्तकातला होता कि काही शब्द न कळत गाळले गेले माझ्या कडून. असो. न राहवून सरते शेवटी मी त्यांना शांत स्वरात / लयीत आणि तालात समजावून सांगितलं कि तुमची ऐपत आहे, "त्याने" तुम्हाला सक्षम ठेवलं आहे हे विम्याचे पैसे भरण्या करता मग हि बाजू बघा. कित्येक असे लोक आहेत ज्यांना साधं वैद्याकडे जाणं परवडत नाही. मग ह्या बद्दल तक्रार करायची का समाधान मानायचं? तुमचं तुम्हीच ठरावा. हे माझं वाक्य त्यांना फक्त पटलंच नाही तर मनापासून आवडलं आणि नाण्याची खणखणीत दुसरी बाजू नेहेमी असते हे देखील खात्रीशीर सिद्ध झालं पुन्हा एकदा, फक्त तशी दृष्टी हवी. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...