सोमवार, २० डिसेंबर, २०२१

लहानपण देगा देवा

मी बाळ असतांना माझ्या गोऱ्या गोमट्या पिटुकल्या हातात घालायला माझ्या आजीआजोबांनी मला सोन्याचे वळे / कडे घेतले होते. अर्थात ती अनेक पिढ्यांची परंपरा आहेच, कारण मी माझ्या पोरांना देखील माझे आणि त्यांचे नवीन आळीपाळीने घातले होते, अनेक वर्ष. एक सोन्याचा मणी आणि एक काळा मणी अशी त्याची रचना असायची साधारण. ते कडे परिधान केल्यामुळे मुलांच्या हाताला तर शोभा येतेच पण असं म्हटलं जातं कि दृष्ट पण लागत नाही. असो. माझा तर अजून एक दृष्टिकोन असा आहे कि आजीआजोबांचा आशीर्वाद लाभतो, आईचं वळ घालायला मिळत आणि गुंतवणूक होते जन्मापासून ती वेगळीच. अर्थात थोडीशी / छोटीशी गुंतवणूक ती पण काही का असेना सुरवात तर होतेच ना. आज हा विषय का म्हणताय मंडळी? तर आज माझी स्वारी माझ्या प्रिय मैत्रिणीला म्हणजेच माझ्या डॉक्टर ला भेटायला गेली होती आणि माझं संपूर्ण लक्ष तिच्या उजव्या मनगटाकडे च होत, किंबहुना वेधलं गेलं, कारण अगदी म्हणजे अगदी तस्संच काळं सोनेरी मण्यांचं हातातलं तिने घातलं होत. ते आधुनिक काळातलं आणि सध्या फॅशन मध्ये असलेले मंगळसूत्र होत.

जेव्हा मी बाळ होते किंवा माझी मैत्रीण बाळ होती तेव्हा आम्हाला कुठे आठवतं
आम्ही / आमचे हात कसे दिसत होते ते हे कडं घालून? नाही का? मग तेच सोनेरी क्षण पुन्हा एकदा आनंदाने जगण्याची संधी / अलभ्य लाभ आहे हा नावीन्याने नटलेला असा.

मला अजूनही आठवतंय प्रकर्षाने माझी लेक बऱ्याच वेळा तिच्या मनगटाकडे कौतुहलाने टकमक बघत असायची, फोटो पण आहेत, कि काय आहे हे माझ्या हातात, असं का आहे, निघत का नाही आहे ई. मी पण असंच काही करत असणारच ना लहानपणी, अर्थात सगळेच करत असणार. त्या सगळ्या मुलींना मिळालेली अजून एक संधी आहे हि आणि ती सगळ्यांनी पट्टाकिनी साधली पाहिजे.

चला तर मग, एक लहानपणीची आठवण जगण्यासाठी, हाताची शोभा द्विगुणित करण्यासाठी, हक्काचा दागिना मिरवण्यासाठी आणि गुंतवणूक म्हणून घेऊ या हे मनगटी मंगळसूत्र आणि झकास मिरवूया देखील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...