माझं सध्याचं नवीन कचेरीतलं वास्तव्य जेथे आहे तेथे मी पाहुणी म्हणून राहते आहे, गेस्ट हाऊस मधे. ती एक ४ मजली इमारत आहे आणि बरेच पालक किंवा इतर ठिकाणचे कर्मचारी येतजात असतात सतत. पालक प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान त्यांच्या पाल्यांना सोडायला येतात तेवढेच काही दिवस वास्तव्य. मी आले राहायला तेव्हा तर १-१.५ महिना अक्षरश: शुकशुकाट होता, मी एकटीच होते, मग आले भरपूर, गेले देखील. हे बघून एकदा काहीजणांनी मला काळजी पोटी बोलायला / सांगायला सुरवात केली कि "अगं काय तु संपूर्ण इमारतीत एकटीच असतेस, भीती नाही वाटत का? असं कसं ई." तेव्हा मी सहज विचार केल्यावर मला हे आढळलं कि गेस्ट हाऊस ला २४ तास एक सिक्युरिटी गार्ड असतो, साफसफाई करणाऱ्या ठराविक चमू असतात, लिफ्ट आहे, गरम पाण्याची अख्खी यंत्रणा आहे, मॅनेजर आहे आणि बाकी मदतनीस आहेत. ह्या माझ्या ४ महिन्यांच्या वास्तव्यात बहुतांशी हि सगळी भिस्त फक्त आणि फक्त माझ्यासाठीच होती जणुकाही, नाही का? जशी कि राणीच. मग जर राणी ची वागणूक मिळते आहे तर मग मी अरेरे एकटी कशी? अजिबातच नाही. सांगा बरं ह्या आधुनिक जमान्यात किती जणींच्या वाट्याला अशी रॉयल पद्धत अनुभवता येते. अशक्यच. माझ्या सारखी भाग्यवान मीच, फक्त एक, ह्या जगावेगळी. आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे आज एक नवीन तांत्रिक महाविद्यालय उभारण्यात माझा हातभार लावता आला, कुठल्याही शाही दरबार / राजधानी उभारण्याच्या कामापेक्षा छोट नव्हतंच ते, मग त्याला राणीच योग्य नाही का?
रविवार, १२ डिसेंबर, २०२१
राणी सारखी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा