आपण अनेकदा बघतो कि घरी छोटी मोठी रिपेअर ची काम करायला जेव्हा एखादा व्यक्ती किंवा चमू येते आणि त्यांना विजेची आवश्यकता असते तेव्हा ते थेट वायर प्लग मधे घालतात. बास, आणि हे नेहेमीचंच आहे, अनेक वर्षात तसूभरही बदल नाहीच.
देवा पासले दिवे, किंवा छोटेखानी लाईट ची वायर आणि प्लग हा दोन पिन वर चालतो. ज्या वस्तूंना कमी वीज लागते ते छोटे ३ प्लग पिन वर चालतात, आणि चार्जे पण होतात सहज. जास्त ऊर्जा लागते तेव्हा पिन मोठी होते आणि त्याच्या दाताचा आकार देखील. हे झालं आपल्या घरच्या वस्तूंचं. पण कारखान्यात अजून भले मोठे प्लग असतील, नाही का. असाच एक मोठा आणि नवीनतम प्लग सध्या मी टीव्ही च्या एका जाहिरातीत बघते आहे. तो म्हणजे हुंदाई कार चार्ज करण्यास वापरलेला, बाप रे.
वस्तूंचा आकार लहान का मोठा, ऊर्जा तीच, पिन ची जाडी कमी जास्त होते आवश्यकतेनुसार. अगदी सभोवतालच्या नात्यांसारखं नाही? पिन, आकार, ऊर्जेची गरज, वस्तू / नात्यांचे प्रकार, प्रसंग ई. बदल घडवत घडवत पुढे प्रस्थान करायचं. कधी आपण ऊर्जेचं स्तोत व्हायचं नाही तर गरज भासल्यास चार्ज घ्यायचा, किती गोड संकल्पना आहे नाही. तर मंडळी शोधून आणि जपून / शिंपून ठेवा आपआपले वैविध्य प्लग्ज.
सोमवार, २० डिसेंबर, २०२१
ऊर्जेचे स्तोत
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा