गेले काही महिने मी संपूर्ण एका डॉक्टर चमूला / वर्गाला तंत्रज्ञानाचे महत्व समजावून सांगते आहे, एक विषय शिकवते आहे. तो विषय शिकवायला सुरवातच करते मी एक वाक्य घोषित करून. वैद्यकीय आणि तांत्रिक शात्राचे अनोखे जणू लग्नच म्हणजे हा विषय होय. आणि त्या नंतर जसे शिकवणे सुरु होते तसे वैविध्य नवीन तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्रात कशी उपयोगी ठरू शकते, किंबहुना ठरते आहे हे उलगडून सांगत असते. बरेचसे अवघड आणि थोडेसे लक्षात ठेवायला कठीण असे ते शब्द असतात खरं आणि ते देखील डॉक्टर मंडळींना.
संपूर्ण आनंदात, मजेत आणि हलकंफुलकं शिकवण संपल आणि मग आली परीक्षेची वेळ. परीक्षा पण झाली आणि आले कि माझ्या कडे त्यांच्या उत्तरपत्रिका तपासायला. मी उडालेच अक्षरशः, एक म्हणजे मी बोललेले सगळे च्या सगळे मुलांनी उत्कृष्ट पद्धतीने लक्षात ठेवले आहेत आणि ते उतरवले देखील उत्तरात. आणि इतक्या सुस्पष्ट अक्षरात, अहाहा, डॉक्टर आणि सुवाच्य हस्ताक्षर हे थोडंस पटण्यासारखं नव्हतं मला पण मी हे विसरले होते कि हि डॉक्टर मंडळी ह्या नवीन पिढीतील आहेत. आता काही अशक्य नाही, हे जुन्या पिढीचं समीकरण बदलले दिसतंय जी फारच चांगली सुरवात आहे. एका क्षेत्रात दिग्गज असलेल्या मंडळींनी नवीन क्षेत्रातले शिकणे म्हणजे फारच कौतुकास्पद आहे माझ्या दृष्टीने. अर्थात कुठल्याच क्षेत्रातल्या मंडळींना नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याशिवाय पर्याय नाहीच म्हणावं आता, पण मला संपूर्ण तो विषय शिकवणे ते उत्तर पत्रिका तपासणे हा प्रवास फारच समाधान आणि अत्यानंद देऊन गेला. असेच डॉक्टर्स येती आणि स्मृती ठेवुनी जाती.
सोमवार, २७ डिसेंबर, २०२१
डॉक्टरांचे हस्ताक्षर
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा