शुक्रवार, १४ जानेवारी, २०२२

स्वछंद

का कोणास ठाऊक पण कदाचित सतत माझ्या आजूबाजूला तरुण पिढीचा घेराव असतो म्हणून माझ्या डोक्यात हा विषय घोळतोय सतत. माझ्या लहानपणीपासून सतत एकाच घोषवाक्य असल्यासारखं मी ऐकलं आहे, बघितलं आहे आणि अनुभवलं देखील आहे कि प्रत्येक मुलगी हि बहुतांशी तिचे केस हे घट्ट बांधणारच, कुठेही असली तरी. काही अंशी पण फारच कमी प्रमाणात मुली सोडत असतं केस पण नाहीच. आणि आत्ताच्या काळात तर कोणी म्हणजे कोणीच केस बांधत नाहीच, सदा न कदा मोकळेच,  मग ते लहान असो व मोठे, शोभणारे असो व नसो, वयोमर्यादा पण नाहीच, सगळ्यांचेच केस गळ्यात. अशी जिद्द का? काय मिळत असावं सातत्याने केस मोकळे सोडून? हि फॅशन का अवडंबर का सोय का तरुण दिसायची धडपड? आणि जगी स्थळी पाषाणी दृष्टीस इतक्यांदा पडलं कि .....

गेले कित्येक वर्ष घरच्या सातत्याने होणाऱ्या पूजा अर्चा, व्रत वैकलय, पंक्ती, ब्राह्मण भोजन ई. थांबल्यामुळे ह्या बदलत्या हवेला जास्त खत पाणी मिळालं का? मला तरी हे एक महत्वाचं कारण वाटतंय, पाश्चात्यांच अनुकरण आहेच. धार्मिक वातावरणात आणि अर्थात जर ते सर्वत्र असेल तर च, गुरुजीच नाही तर सगळेच केस बांधण्याचे सल्ले देतातच, किंबहुना केस बांधले नाहीत तर इतक्या मोठ्या प्रमाणातली काम कशी करता येणार, पंक्ती वाढतांना पण गैरसोय होणार, आणि अशी अनेक कारणे आहेत.

बांधूनच ठेवा केस नेहेमी हा माझा अट्टाहास नाहीच, विविध केशरचना करा, प्रसंगानुसार, वयानुसार, पोशाखानुसार ई. आणि एकदा आरसा बघा आणि मग ठरावा. "आपण करू ती फॅशन" हेच खरं असलं तरी बरेचदा मोठ्या मोकळ्या केसांचा धोखा जास्त उपयोगा पेक्षा. खरंच योग्य कारण असेल तर नक्की सोडा मोकळे आणि राहा की स्वछंद, पण उठ सुठ नको. हजारो प्रकारच्या पिना, फुलं आणि अनेकविध गोष्टी उपलब्ध आहेत बाजारात, त्या पण वापरा म्हणजे स्वतःला आणि बघणाऱ्याला देखील विविधता अनुभवता येईल, रोज तेच गळ्यातले केस बघण्यापेक्षा. अनेक शास्त्रद्यांनी ह्या वर सखोल अभ्यासाअंती असा निर्णय दिलाय कि बहुतांशी केसांचं आयुष्य, पोत आणि एकंदरीत रया जाते जर सातत्याने मोकळे सोडले तर, त्यांना सगळ्याच प्रकारची सवय ठेवा. त्यामुळे प्रॅक्टिकली स्वछंद राहणं म्हणजे विविध केशरचना करण्यात आनंद मानणं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...