रविवार, ३० जानेवारी, २०२२

सवय आणि सेवा

आज माझं जरा जास्त चालणं झालं दररोजच्या पेक्षा, काही कामं निघाली आणि त्यामुळे पाय बोलायला लागले. माझ्या मनात आलं कि आज नक्की माझ्या लेकीला म्हणायचं कि जरा माझे पाय चेपून दे. आणि खात्री तर होतीच कि ती नाही म्हणणार नाही. त्या वरुन मला एक किस्सा आठवला माझ्या दररोजच्या ऑटो वाल्याने स्वःताहुन सांगितला. का? कुणास ठाऊक. दिवसभर म्हणे एका दिवशी जास्त झालं ऑटो चालवणं, घरी आल्यावर त्यांनी त्याच्या मुलाला म्हटलं कि जरा पाय दे, पाठिवर पायांवर चाल, तर तो मुलगा म्हणतो कसा "शेजारी औषधाचं दुकान आहे, गोळी आणा बाबा, दाबून का घेता?" म्हणजे त्याला असं सुचवायचं होत कि हि अशी सेवा करून घ्यायची सवय बरी नाही तब्बेतीला. काय हि पिढी नाही, हुशार म्हणावी, का स्मार्ट, का आगाऊ, कोण शिकवत असेल ह्यांना असं बोलायला. आणि त्यातून गेली दोन एक वर्ष हि मंडळी घरीच आहेत हो, बाहेर पडणं नाही, बाकी मित्र मंडळींना भेटणं नाही आणि त्यामुळे उगाच काही कानावर पडलं नसेल, मग हे प्रसंगावधान राखून बरोबर त्या वेळी बोलणं जमत कसं हा मला पडलेला ज्वलंत प्रश्न आहे. माझी एक नात आहे, तिच्या आजोबांनी पण पाठिवर चाल म्हटलं कि हि बया धूम ठोकते, पळून जाते आणि थोडावेळ येत नाही समोर, कित्ती हुषार नाही. असो, असं हि सही.

ह्या छोट्याश्या प्रसंगातून हाच धडा मिळतो कि १. जुने विचार / आचार आणि अपेक्षा बाजूला ठेवा, मुलांसाठी आम्ही हे केलं ते केलं त्यामुळे त्यांनी आमची सेवा केलीच पाहिजे असा हट्ट सोडा, किंबहुना ठेवूच नका, म्हणजे सोडायचा प्रश्नच येत नाही, अपेक्षा नकोतच, आणि २. मुलांना त्यांचं विश्व आहे ना, मग त्यातून वेळ काढणं कधी कधी मुश्किल होईल आणि गैरसमज नको व्हायला, ३. मालिश च्या किंवा अ‍ॅक्युप्रेशर च्या व्यवसायात असलेल्या लोकांना मग काम कसं मिळणार.

स्वतःला ठणठणीत ठेवा, आतून बाहेरून, शारीरिक मानसिक रूपाने, पोटभर हसा, पौष्टिक खा, व्यायाम करा आणि आनंदी समाधानी राहा. कदाचित कोणाचीच गरज पडणार नाहीच, पण सहज बदल, गम्मत आणि रक्ताभिसरण व्यवस्थित होण्या करता अधे मधे बोलवा अ‍ॅक्युप्रेशर किंवा मालिश करण्यास, बास, मज्जाच मज्जा नाही का. "आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोही कडे".

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...