बुधवार, २६ जानेवारी, २०२२

मेडिसी इफेक्ट

परवाची मज्जा, सकाळी माझी फारच पळापळ आणि धावपळ सुरु होती, धडपड म्हणा त्याला, कारण नागपूरच्या ४-५ महिन्यांच्या वास्तव्या नंतर आणि तिथल्या एकंदरीत बदललेल्या रोजनिशी मुळे मला माझ्याच स्वयंपाक घरात सुचत नव्हतं. मावशी सुट्टीवर आणि मला ऑफिस, त्यामुळे डब्बा, नाश्ता करायचा होता, घड्याळ बघत. बटाटे लावले कुकर मधे, सवय मोडल्यामुळे असेल किंवा माझी कुकरची दोस्ती थोडीशी कमी झाल्यामुळे असेल, अंदाज चुकल्यामुळे शिट्टी बरोबर गरमागरम पाणी पण बाहेर येत होत, फवाऱ्यासारखं. इतस्ततः पसरत होतं आणि त्यात माझ्या डोक्यात ह्या विषयावर लिहावं असं चालू होत. देवा. काही दिवसांपूर्वीच मेडिसी इफेक्ट बद्दल माझ्या विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं होत आणि ते देखील कुकर कडे बघतांना लक्षात आलं, त्यात गेली दोन एक वर्ष कुकर ची जाहिरात आहे ज्यात असं म्हटलं आहे कि कुकर मधनं पाणी बाहेर आलं तर पसारा होतो, आवरावे लागतं त्यामुळे त्यांनी कुकरच्या झाकणावर थोडासा खोलगट भाग तय्यार केला म्हणजे 

१. पाणी त्यात साठतं जर बाहेर आलंच तर आणि 

२. पुढची शिट्टी येईस्तोवर उष्णतेमुळे साचलेलं थोडसं पाणी वाफ होऊन निघून जातं. थोडक्यात काय स्वयंपाक घरात नीटनेटकेपणा टिकून राहतो / स्वच्छता राहते ई. 

बघा म्हणजे त्या एवढ्या मोठ्या कुकरच्या कंपनीला सुद्धा अजून समजलं नाही कि पाणी बाहेर का पडतं, त्यांचं संशोधन अजून सुरु असेल, पण तो वर "एक पाऊल पुढे" ह्या प्रमाणे त्यांनी एक छोटेसे इन्व्हेंशन शोधून काढले आणि ते लोकांना आवडले देखील. असे नवीन झाकण असलेले कुकर मस्त विकले जात आहेत. त्यामुळे संपूर्ण नवीन कुकर तय्यार होई पर्यंत का थांबायचं, छोटेसे नवीन काही तरी सतत शोधत राहत पुढे जाणं जास्त महत्वाचं, नाही का? वा,मेडिसी इफेक्ट चं माझ्या दृष्टीने हे एक छान उदाहरण आहे. बरं झालं त्या दिवशी मावशी नाही आल्या, मी शिरले स्वयंपाक घरात, कुकर लावला, त्यातनं पाणी बाहेर आलं, तेवढ्यातच मेडिसी चा वर्ग झाला होता, कुकर कंपनीची जाहिरात देखील आठवली आणि गोळाबेरीज म्हणजे हि पिटुकली अनुकथा. तर असेच प्रत्येक क्षेत्रात छोटे नवीन टप्पे विचारपूर्वक गाठूयात, मोठ्ठं काहीतरी प्रत्येक वेळी होईलच ह्याची वाट नको बघायला आणि वाईट वाटून घ्यायला, समाधान मानत पुढच्या पायरीची तय्यारी करूयात.  "उठा उठा हो सकळिक, वाचे बरावा गजमुख, रिद्धी सिद्धीचा नायक, गणपती".

२ टिप्पण्या:

  1. Now that the new cooker is available in the market, you can come to Nagpur once again and buy the new cooker from here itself and take it with you when you go back!

    उत्तर द्याहटवा
  2. Oh wow, awesome and most unique solution, beyond my thinking arena indeed. I will, for sure, soon come to Nagpur all the way from Pune and buy a new cooker. It will be most unique bahana to meet you all once again. So sweet, thank you for your immediate reply.

    उत्तर द्याहटवा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...