रविवार, ९ जानेवारी, २०२२

परतीचा प्रवास

"या चिमण्यांनो परत फिरा रे, घरा कडे आपुल्या, जाहल्या तिन्ही सांजा...."

हे गाणं जिव्हाळा चित्रपटातलं आहे आणि माझ्या फारच जिव्हाळ्याचं देखील. अनगिनत वर्ष मी ते ऐकलं आहे, अगदी मनापासून आणि काही वेळा गाण्याच्या वर्गात म्हणण्याचा विफल प्रयास केला होता. असो.

आज जास्त प्रकर्षाने ह्या सदाबहार गीताची आठवण तर आलीच पण जाणीव / ओळख नव्याने झाली, महती पटली.

आपण दररोज सकाळी व्यायाम म्हणून चालायला जातो तरी देखील परतीची वेळ, मार्ग किंवा अंतर ठरवून जातो. पक्षी देखील तस्सेच, कचेरीत जाणं येणं, गावाला / सहलीला आणि इतर कुठेही असो तेच. अगदी बँकेचं फिक्स्ड डिपॉझिट असो, नाहीतर एकदा खाद्य पदार्थ, नाहीतर औषध किंवा नोकरी, सगळ्यांना परतीचा प्रवास अनिवार्य त्या ठरलेल्या दिवशी.

माझं पण अगदी तसेच झाले. सप्टेंबर मध्ये च ठरले कि साधारणतः ४-५ महिन्यात परतीला सुरवात करायची. आज केली. आणि म्हणूनच आलेले अनुभव थोडक्यात मांडावे असं मनस्वी ठरवलं. हा त्याचा एक प्रयन्त.    आतून बाहेरून धारा सुरूच होत्या, त्या कधी कोणाला दिसल्या आणि कधी नाही, माझ्या डोळ्यांतुन आणि निसर्गा तर्फे देखील हो. अहो आश्चर्य पण जानेवारीत पाऊस आणि नेमका मी विमानात बसले कि सुरु झाला, माझ्या अगदी जवळ असलेल्या खिडकीत पाणी वाहत होत आणि एक वेगळाच चटका देऊन जात होता. आणि पठ्ठा अगदी थोड्या वेळ आला आणि गायब पण झाला हो. कदाचित तो हे सांगण्याचा प्र्यन्त करत असेल कि वाईट वाटणं साहजिक आहेच पण पुढे मार्गक्रमणा करण्यासाठी ह्याच अश्रुंची फुलं करणं आवश्यक आहे. परततांना असंख्य आठवणी घेऊन निघा आणि त्यावर पुढील मनोरा रचा, आव्हान पेला, हसत खेळत दुसऱ्यांसोबत पुढील ध्येय साध्य कराच. कारण जितका सुरवातीचा प्रवास महत्वाचा कणभर जास्तच परतीचा कारण ते उगम स्थान असत पुढील नवीन प्रवासाचे, नवीन नात्यांचे, लक्षांचे, ध्येयाचे आणि जिंकायचे. चला तर मग, माननीय लता दीदींचे स्वर ऐकत प्रत्येक परतीचा प्रवास सुखावह करूयात, सुवर्णाक्षरात लिहिल्या जातील अश्या आठवणीने, प्रचंड उत्साहाने  आणि समाधानाने.
https://www.youtube.com/watch?v=bC6sU4oYBpg

४ टिप्पण्या:

  1. Returning to ones home after an achievement of sorts, having accomplished a daunting task that too single handedly, having faced so many obstacles and challenges along the way would be a completely different 'home coming' after all..with all its mixed feelings and emotions; of sadness as of joy...
    A 'home coming' from 'a home away from home'!!

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. 1. Thank you so much for your immediate response and truly motivational words. 2. This is my status at present for my Nagpur stay actually, https://www.youtube.com/watch?v=6C0Ofw8y5r4

      हटवा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...