रविवार, ९ जानेवारी, २०२२

मला वेड लागले प्रेमाचे

आता काय काय आणि कसं सांगू, कुठून आणि कशी सुरवात करू, शेवट करू का नको करू काहीही म्हणजे काहीही आकलन होत नाही आहे. प्रेमात एकदाच पडतात का हो? आणि फक्त माणसांच्याच का?

माझं तर उत्तर नाही असं आहे. कारण गेले चार-पाच महिने पुन्हा एकदा माझ्या नागपूरला वास्तव्य करतांना इतके जण दृष्टीपथात आले, इतक्या वस्तूंसोबत वेळ घालवता आला आणि इतकी ठिकाण पुन्हा एकदा नव्याने ओळखता आली कि ज्याचं नाव ते, प्रेमात पडलेच पुन्हा, प्रचंड. आणि हो मंडळी जशी मी त्यांच्यावर प्रेम करायला लागले नकळत तस्सेच काही जण देखील हो, मूक असे, न बोलता,न व्यक्त करता आणि काही फारच बदमाश देखील होते. काहींनी संपूर्ण ४-५ महिने त्यांचं प्रेम व्यक्त केलं आणि काहींना उशिरा जाग आली आणि खूप खूप वाईट वाटलं कारण माझं काम आता संपुष्टात आलं होत आणि निघायची वेळ आली होती. मग काय थोडेसे वेडे चाळे, अनपेक्षित असे सुरु केले कि हो, माझी गेले ३-४ रात्रीची झोपच उडवली पठ्यांनी. इतके महिने शांत झोपेची सवय झालेली आणि अचानक हा प्रेमळ बदल थोडासा अपचनी पडला हो. आणि असे सगळे पण प्रेमळ असू शकतात हे नव्याने उमगलं.

नागपूर आणि पुणे संस्थेचं प्रचंड काम एकसाथ चालू होत आणि त्यामुळे रात्रीची झोप कधी, कशी, केव्हा आणि किती लागत असे ह्याचा हिशोबच नव्हता आणि जाणीव नाहीच, गृहीतच धरल्यासारखं झालं होत. त्या खोलीला, मुख्यत्वे गादीला, पांघरुणाला, पंख्याला, एकंदरीत वातावरणाला मी मनापासून धन्यवाद देत होतेच, पण एक निसटला होता वर्ग, कारण तो माझ्या पुढ्यात कधी अवतरलाच नाही. जसं त्यांच्या कानावर शब्द / बोल पडले कि मी आता निघणार कायमची त्यांना पण मग माझ्या सोबत गप्पा आणि कानगोष्टी कराव्याश्या वाटल्या, कित्ती कित्ती प्रेम बघा. आणि सुरु झाले हो, एकसाथ अनेक, एखाद-दोन ह्या कानापाशी, बाकीचे त्या कानापाशी, काही आजुला तर काही बाजुला, अगदी शर्यत त्यांच्यात जशी. कोण किती आणि किती वेळ गाणी सादर करतंय, काही अजून ऐकवतंय, आवाजात चढ उतार ई. विचारू नका. सरते शेवटी मी हात टेकून त्यांना काय म्हणायचं आहे, ते माझ्या कित्ती प्रेमात आहेत, मी चाललेय ह्याच त्यांना कित्ती वाईट वाटतंय हे सगळं समजावून घेतलंच. चार दिवस अंथरुणात बसून काढले आणि मज्जा अनुभवता आली. असं प्रेम पुन्हा मिळणार आहे का? अशक्यच. आणि कुठे लिहून ठेवलंय कि रात्र हि फक्त झोपण्यासाठीच असते, नाही. अश्या पद्धतीने त्या प्रेमळ झुंडाकडे बघितलं तर समजेल हो. अर्थात जस माझ्या इनोव्हा नी, वायफाय नी, सगळ्या जणांनी, स्टाफ नि माझ्या सोबत वेळ घालवला, दिला त्यात राहून गेलेल्या  डासांना पण द्यावासा वाटला आणि ते मला फारच भावलं.

त्यामुळे मंडळी "बोलेवीण भाषा", "शब्दाविना भाव" जो कोणी सजीव, निर्जीव किंवा इतर दर्शवू इच्छितात त्यांचं सहर्ष स्वागत कराच आणि मग बघा प्रेमाची नवी परिभाषा कशी उलगडते ते, प्रकर्षाने जाणवते आणि वेगळीच ऊर्जा / दृष्टी देऊन जाते.

https://www.youtube.com/watch?v=0NhfdSQKUKw

२ टिप्पण्या:

  1. Very touching..very inspiring..very endearing. In your departure you would have left a void in the hearts of many yet, the memories that you left behind will remain evergreen and vibrant.

    उत्तर द्याहटवा
  2. I reciprocate the same. As mentioned earlier I am all alone here, back to Pune, you all are still there with each other. So think of me. But yes, need to live these awesome memories of unique people, I am truly blessed to have you all. Thank you for your reply, really appreciate it.

    उत्तर द्याहटवा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...