बुधवार, २३ फेब्रुवारी, २०२२

माझा प्रवास फियाट - जीप ते क्रेटा

अगदी समजायला लागल्यापासून मी अनेक प्रकारच्या चारचाकीतून प्रवास केला आहे, आकाशाला गवसणी घातली आहे, पळती झाडे अनुभवली आहेत. कारण फार सोप्प, माझ्या वडिलांचा हुद्दा मोठा होता आणि त्यांना दौऱ्यावर जावं लागत असे अनेक वेळा त्यामुळे अनेक गाड्या त्यांना वापरण्या करता देण्यात आल्या होत्या. मी पांढरा छोटा हत्ती त्यावेळी, त्यामुळे सगळेच ड्राइव्हर-काका लाड करायचे, दररोज अगदी न चुकता, कित्तीही थकलेले असले तरी, कितिही प्रवास करून आले असले तरी मला चक्कर मिळायचीच, अलिखित नियम होता ना. ते मी इतकं म्हणजे इतकं पोटभर एन्जॉय करायची कि ज्याचं नाव ते. आणि सलग अनेक वर्ष हो. त्या सगळ्या विविध आकाराच्या, प्रकारच्या जीप होत्या बिना दाराच्या. मग आली फियाट, उलट्या बाजूने दार उघडतं असे, पिटुकली कार ती.  त्यानंतर फारच मनापासून मी आंब्यास्याडर नावाची भली मोठी कार उपभोगली. राजेशाहीच थाट होता तिचा त्यावेळी. त्यानंतर अमेरिकेतल्या गाड्या छोट्या, मोठ्या, तिथल्या जीप, अगदी काही मिनिटांकरता बस कम बोट ई. सगळं म्हणजे सगळं चालवलं आणि फारच गट्टी जमली माझी हवेशी, रस्त्यांशी, आकाशाशी, बर्फाशी सुद्धा,  काय विचारता.  पुन्हा भारतात परत आल्यावर सँट्रो, पॅलिओ, जॅझ असा केला प्रवास आणि काल बसले नव्या कोऱ्या करकरीत क्रेटात. त्याचे सीट चे प्लास्टिक पण अजून तस्सेच आहेत, इतकी नवीन हो ती. तिचा नव्याचा सुगंध, अहाहा, शब्दात बांधणे म्हणजे गुन्हा च होईल हो. क्रेटात तब्बल २० मिनिटे चक्कर, ते देखील एका दिवसात दोन्ही वेळा, काय पर्वणी होती म्हणून सांगते. पोटातलं पाणी देखील हाललं नाही हो. अर्थात त्याच श्रेय माझी विद्यार्थिनी च्या ड्राइविंग कौशल्याला पण जात. अशी चिकणी गाडी असल्यावर आपोआपच भन्नाट ड्राइविंग होणार ह्यात शंकाच नाही. म्हणजे मला एक तर त्या नशेत समजलंच नाही कि आम्ही कधी पोचलो ठिकाणावर आणि शिवाय रोज येतो-जातो त्याच रस्त्यावर चालतोय हे फार अवघड होत अकॅसेप्ट करणं. जे जे माझ्या सोबत आहेत ना अगदी माझ्या वडिलांच्या वेळेपासून त्यांनी त्यांनी माझी चक्कर ची आवड हेरली आणि नेहेमी वैविध्य गाड्या चा अनुभव दिलाच. त्यानंतर मी पण मनापासून चालवणं इतकं शिकले कि मी स्वतः आणि त्यामुळे माझी गाडी दोघीही मस्ती खूप करतो. हे सगळं एका कडेला चालू असतांना दुचाकी पण पोटभर आणि भन्नाट वेगाने चालवल्या त्या देखील वैविध्य प्रकारच्या. असा हा अगदी लहानपणी सुरु झालेला रास्ता, हवा, ढग ह्यांच्याशी संवादाचा प्रवास आज तागायत अविरत सुरु आहे आणि सुरु राहील देखील. मी, माझ्या सोबतच्या प्रवाशांनी आणि अर्थात त्या सगळ्या वाहनांनी इतकं प्रचंड एन्जॉय केलं त्यामुळे इतकी वर्ष हि मैत्री कायम राहिली, टिकली. चला तर मग, आपआपले सगळे उपभोगलेले प्रवास आठवू या आणि पुन्हा त्या केलेल्या सफारी वर निघुयात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...