मंगळवार, २२ फेब्रुवारी, २०२२

"गोड खायला मिळणार"

मंडळी आज मी पुन्हा एकदा माझ्या शालेय दिवसांची, मित्रमैत्रिणींसोबत व्यतीत केलेल्या सोनेरी क्षणाची सफर करून आले, पुन्हा  एकदा, अहाहा. तुम्ही सर्वांनी पण हे अनुभवलं असेलच, एकदम दोघे एकच शब्द बोलले कि "आज गोड नक्की खायला मिळणार" असं काहीसं म्हणत असू. एकत्र बोलण्याचा आणि गोड खायला मिळण्याचा, त्या योग-योगाचा काय संबंध हे मला नाही ठाऊक, किंबहुना कोणालाच नसेल ठाऊक, पण पिढ्यांपिढ्या हे वाक्य वापरलं जात होत हे निश्चित. 

  • आणि त्यात कित्येकदा खरंच खायला गोड मिळालं का?
  • काय  मिळालं?
  • आणि किती मिळालं?
  • कोणाकडे मिळालं? कि 
  • स्वतः केलं? / विकत घेतलं? ई. कीस पडत आम्ही कोणीच बसलो नव्हतो आणि नाही देखील. 

आज ह्या विषयाची आठवण का झाली? सांगते.  

मी आणि श्रद्धाने (माझ्या संशोधन करणाऱ्या विद्यार्थिनीने) एकाच वेळेस एकच शब्द टाईप केला व्हाट्सऍप वर हो, तो इतका एकाच वेळी होता कि ताबडतोब एक तर आम्ही दोघी पहिल्यांदा पोटभर हसलो फोन करून कारण फोन कारण्याबद्दलच होता तो शब्द आणि मग अचानक लक्षात आलं कि आज नक्कीच तोंड गोड होणारच, आधुनिक पद्धतीने का होईना एकत्र एकच शब्द नकळत उच्चारला / वापरला गेला ना. प्रत्येक वेळी "का?" ह्याने काय होत? खरंच होत का? ह्यात काय अर्थ आहे? ई. किंवा अजून भरपूर प्रश्न विचारण्याच्या भानगडीत न पडता फक्त तो क्षण, ती परंपरा, हे अमुल्य हास्य, आणि गोड नक्की फक्त उपभोग, एन्जॉय करा पोटभर. त्यात तथ्य असो वा नसो, काय फरक पडतो. पंगतीत, पार्टीत, ठरवून आणि अपेक्षित / विकत घेऊन तर नेहेमीच गोड खातो आपण, एखाद वेळी अश्या मुळे मिळालेल्या गोडाचा आस्वाद घेऊ यात आणि स्मृती / आठवणींचा साठा वाढवू या, म्हणजे काही वर्षांनी हे वाचून किंवा मनात येऊन खुद्कन गालावर जे हसू फुटेल त्याला तोड नसेलच.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...