मंगळवार, १५ फेब्रुवारी, २०२२

अंगवळणी पडलेलं भाष्य

तर त्याचं असं झालं कि पुण्याहून नागपूरला जायच्या आधीच तिथलं माझं वास्तव्य अगदी थोड्या काळाचं असणार आहे हे ठरलं होत. त्यामुळे मी आणि माझ्या आजूबाजूच्या त्या सर्वांनी न ठरवता पण जगून घेतलं, मस्त मज्जा केली, प्रत्येक वेळी जमेल तस्स अत्यानंदात घालवले दिवस. त्यामुळे माझी आठवण म्हणून प्रत्येक मैत्रिणीला एक छोटी भेटवस्तू द्यायचं ठरवलं आणि घ्यायला गेले सुद्धा. ऑनलाईन शोधाशोध केली आणि आवडीचं दुकान गाठलंच. मुलींना द्यायचं आणि ते देखील संक्रांतीच्या वेळेला म्हणून खोटा पण एक दागिना घ्यायचा ठरवला. मला त्या क्षणी फक्त सोनेरी आणि चांदीचा रंग फक्त लक्षात राहिला. पण दुकानात गेल्यावर हर तऱ्हेचे ब्लॅक मेटल चे सेट जास्त भावले आणि तेच घ्यायचं ठरवलं. तो दुकानदार सुद्धा मोठं गिऱ्हाईक पाहून इतका खुश होता, आणि त्या आनंदाच्या भरात म्हणतो कसा, फार छान चॉईस आहे मॅडम तुमची, आवडेल सर्वांना आणि संक्रांतीच्या निमित्याने काळं शोभून दिसेल. मी ब्लॅक मेटल चा मंगळसूत्र आणि कानातल्याच सेट पसंद केले होते प्रत्येकीला विविध्य डिझाईनचे. पण उत्साहाच्या आणि आनंदाच्या उकळ्या फुटत असल्यामुळे तो दुकानदार म्हणतो कसा, फक्त पाणी लागू देऊ नका हो ह्या गळ्यातल्या आणि कानातल्यांना नाहीतर काळे पडतील. बाप रे, मी फक्त जमिनीवर पडले नाही, हसून हसून पुरेवाट  अक्षरशः. त्या बिचाऱ्याला चांदी आणि सोन्याच्या रंगांचे दागिने विकायची नेहेमीची सवय हे जरा नवीन प्रकार, पण अंगवळणी पडलेले भाष्य पडले बाहेर सहज हो तोंडातून. पण फारच अप्रतिम अनुभव होता तो. नेहेमी साठी लक्षात राहणारा.  आधीच काळे ते काळे कसे पडणार? त्याचा अर्थ असा नाही कि वाट्टेल तसं वापरायचं, कदाचित हे पांढरे पडतील. असो, खोटे खरे सगळेच दागिने महत्वाचे, सगळ्यांचीच सारखीच काळजी घेऊ या म्हणजे खूप दिवस ते टिकतील आणि सर्वांना वैविध्य प्रकार मिरवता येतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...