रविवार, २० मार्च, २०२२

क्षमता

लग्न, मुंज, वास्तू आणि इतर असे अनेक कार्यक्रम मी अगदी लहानपणीपासून नुसती उपस्थित राहिले नाही तर पूर्ण आनंद देखील उपभोगला आहे. मी लहान होते तेव्हा पासून ते अनेक वर्ष अश्या सगळ्या कार्यक्रमात तेव्हा पंगती असायच्या, वाढपी असायचे. संपूर्ण जेवण ते देखील अश्या समारंभातलं, घराबाहेरचं, आचऱ्याने केलेलं झाल्यावर आग्रह सुरु व्हायचा. आणि त्याकाळची मंडळी पण वेगळीच, संपूर्ण जेवण झाल्यावर शर्यतीत भाग घ्यायचे, ताटभर जिलबी काय, लाडू काय आणि बरेच काही फस्त करण्याची शर्यत. बाप रे, कसं जमत असेल कोणास ठाऊक. बरं  त्यावेळी अत्याधुनिक जीम, वातानुकूलित व्यायाम व्यवस्था ई. काहीही नव्हतं हो, जे होत ते सगळं नैसर्गिक. कष्टाची कामं, शुद्ध हवा-पाणी-वातावरण ई. त्यामुळे सर्वांच्याच तब्बेती अगदी ठणठणीत. त्यामुळे असेल कदाचित हे असे खाण्याचे प्रकार पण काहीही म्हणा साष्टांग दंडवत त्या पिढीच्या लोकांना. काहीही तुलना नाहीच पण सध्या एक तुकडा जिलबी, नाही तर जास्तीत जास्त एक अख्खी जिलबी, आणि बाकी गोड पदार्थांचे देखील तस्सेच. वेड्यासारखं रस्त्यावर धावून, वातानुकूलित जिम लावून, जिभेवर ताबा मिळवून शेवटी काय तर मोठी यादी, हे खाल्लं कि असं होईल ते सेवन केलं कि तस्स, शांतता आणि स्थिरता कुठे तरी हरवली आहे हे निश्चित.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...