सोमवार, ७ मार्च, २०२२

प्रदक्षिणा

हा अप्रतिम, भावपूर्ण शब्द ऐकला कि अनेक आठवणी जाग्या झाल्याशिवाय राहत नाहीतच, मग त्यात आई बाबांसोबत असंख्य देवळात घातलेल्या प्रदक्षिणा असोत नाही तर त्यानंतर ह्यांच्या सोबत प्रत्येक अष्टविनायकाच्या दरबारी भावपूर्वक पूर्ण केलेल्या २१ प्रदक्षिणा असो जोडीने, अनेक आहेत प्रसंग. त्यातले दोन किस्से येथे नमूद करावेसे वाटतात प्रकर्षाने मला. एक तर आज का कुणास ठाऊक पण "धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरू रायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायची" हे भजन / हि आरती मला खूपच गुणगुणावीशी वाटते आहे.

माझी एक मैत्रीण होती. तिच्या वडिलांना खूप लवकर प्रकृतीचे अनेकविध त्रास सुरु झाले. ते वाढले आणि इलाज सापडत नव्हता. मग सरते शेवटी अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर ते एका ज्योतिष्याकडे गेले. त्यांनी एक उपाय करायला सांगितला काकांना पत्रिका बघून आणि तो तरणोपाय ठरला, रामबाण इलाज जसा. काका ठणठणीत बरे झाले तो उपाय केल्यामुळे. त्या ज्योतिष्याने विचारान्ती त्यांना सांगितलं कि तुमच्या घराशेजारी जे मंदिर आहे तेथे रोज जायचं, आणि पहिल्या काही दिवस एक, नंतर दोन अश्या ११ /२१ ई. प्रदक्षिणा करायच्या, आज पासून. एक लोहचुंबकीय उपचार लाभतो प्रत्येकाला प्रदक्षिणा घालतांना कारण मूर्ती स्थापनेच्या वेळी तशी वैज्ञानिक व्यवस्थाच केली असते. आणि शिवाय पायी चालतांना ते देखील अनवाणी त्यामुळे ऍक्युप्रेशर पण सहज साधले आणि ठणठणीत बरे व्हायला मदत झाली. एक समाधान मिळालं कारण रोज देवाचं दर्शन होत होतं आणि अनेक महिन्यांपासून मोकळी हवा अनुभवली नव्हती, निसर्ग, पक्षी, ऊन, सगळं म्हणजे सगळ्या पद्धतीचे प्रोटीन, व्हिटॅमिन ई. शोषून घेतले गेले.

असेच तत्सम चुंबकीय शक्ती असलेले काही जर भारतातल्या कार / गाड्यांमधे बसवता आलं तर अजून हजारो लोकांना नकळत प्रचंड फायदा होईल. कसे म्हणताय ? सांगते. आज सहज माझं सकाळी लक्ष गेलं तर खाली पार्किंग मधे  काही मुलं / तरुण मंडळी गाड्या पुसत / धुवत होती. त्यांच्या ठराविक पॅटर्न प्रमाणे आधी संपूर्ण गाडी वर इकडून तिकडून फिरून पाणी टाकलं गेलं, मग ओलं फडकं आणि तदनंतर कोरडा हात फिरवला गेला, सातत्याने गोल गोल त्या गाडी भोवती फिरत, जशी गरज होती त्या पद्धतीने. आणि प्रत्येक तरुण आमच्या भल्यामोठ्या सोसायटी त अनेक गाड्या पुसतात / धुतात. मग विचार करा ह्या वैविध्य प्रदक्षिणाच नाहीत का? त्या सगळ्या तरुणांच्या कष्टाला सलाम, आणि मॅग्नेटिक डिस्क जर कोणत्या न कोणत्या पद्धतीने गाड्यांमधे बसवता आली मध्यभागी किंवा कुठेतरी तर देवळात अनुभता येतो तस्सा नकळत फायदा होईलच ह्यात शंका नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...