हिरवा रंग म्हटला ला रे म्हटला कि डोळ्यासमोर काय उभं ठाकतं मंडळी? एक शांतता, वाढ, विस्तार, निसर्ग, आशीर्वाद, उन्नती, समृद्धी, बहर आणि प्रसन्नता ई. मग ते आपण गवतकडे बघून किंवा झाडावरच्या नवीन पालवी कडे बघून किंवा बहरलेल्या शेतीकडे बघून चटकिनी लक्षात येतं, अनुभवता येतंच, ह्यात काही दुमत नाहीच. नो वंडर ह्या वर्षीची जागतिक महिला दिनाची थिम हिरवा रंग आहे.
ह्या अश्या जगभर साजऱ्या होणाऱ्या दिवशी माझ्या इतक्यात विद्यावाचस्पती झालेल्या विद्यार्थ्यांनी आणि मी मिळून अख्ख्या कचेरीला एकत्र आणायचा घाट घातला. सर्वांचं तोंड गोड करायचं, अनेक वर्षांनी हवा हवा असा संवाद सर्वांसोबत साधायचा हाच काय तो प्रांजळ उद्देश, अर्थात हातात वाफाळत्या चहाचा कप घेऊनच. आजच्या छोटेखानी स्नेहसंमेलनाचा उद्देष हा होता कि माझ्या इतक्यात विद्यावाचस्पती झालेल्या विद्यार्थ्याला आणि मला बढती मिळाली. बढती अक्का प्रमोशन म्हणजे उन्नती, समृद्धी, बहर च नाही का? आणि अर्थात तो कोणात घडून आला आहे, किंवा येईल तर त्या व्यक्तित, त्या ऑफिस मधे आणि इतर सर्वांसाठी देखील बहुउपयोगी, अनेक गोष्टी किंवा पातळीवर प्रेरित करणारा असा. एक एक पायऱ्या चढण्याकरता आणि पुढील मार्गक्रमण सुकर होण्याकरता आपल्या आजूबाजूचे उदाहरणं जास्त उपयोगी पडतात. अगदी हिरवा रंग जसा सातत्याने बाहार आणतो, उत्साह देतो अगदी तस्सेच काहीसे आज सर्वांनी अनुभवले ह्यात शंकाच नाही. मज्जा आली आणि हे स्नेहसंमेलन सर्वांसाठी होत कारण प्रमोशन मधे प्रत्येकाचा हातभार कळत / नकळत, प्रत्यक्ष्य / अप्रत्यक्ष पणे लागलेलाच असतो हे त्रिवार सत्य आहेच, अगदी जशी हिरवळ कळत / नकळत, प्रत्यक्ष्य / अप्रत्यक्ष पणे सगळ्यांनाच भरभरून देते अगदी तशी.
ज्या संस्थेने ह्या वर्षीचा हा रंग ठरवला आहे त्यांना मनापासून धन्यवाद आणि मला ह्या खास दिवशीच्या हिरव्या रंगाकडे अश्या रितीने बघता आलं, अनुभता आलं हे खूप ऊर्जा देऊन जाणारं निश्चित आहे. सर्वांना, अगदी माझ्या वरिष्ठांना पासून ते शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांना मनापासून धन्यवाद आणि आभार.
मंगळवार, ८ मार्च, २०२२
विस्तार
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
Mastt mam...you are fab!
उत्तर द्याहटवाThank you so much mam, you already made my day. Just penned down my flow of thoughts. Thank you again, motivating indeed.
उत्तर द्याहटवा