आपल्या मुंबई ची आन-बान-शान काही निराळीच, नाही का? आणि ती वर्षानुवर्षे चालतं आली आहे अगदी परंपरे सारखी. तर ह्या मुंबई शहराच्या अनेकविध वैशिष्ठ्यांपैकी एक म्हणजे घरात जागेचा अभाव. अर्थातच मी मध्यम वर्गीय कुटुंबाबद्दल बोलते आहे. त्यामुळे मी असंख्य वेळा असं ऐकलं आणि वाचलं आहे कि तेथे मेज आणि पलंग सारख्या मोठ्या वस्तूंना घरी जागाच नाही, थारा नाही म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण तल्लख बुध्दीचे मुंबईकर शांत थोडीच बसणार आहेत त्यांनी त्यावर तरणोपाय शोधून काढलाच आणि तो म्हणजे मेज आणि पलंग किंवा बाकी काही वस्तू हव्या तेव्हा खाली पाडून घ्यायच्या आणि नको तेव्हा भिंतींवर विसावू द्यायच्या. आहे कि नाही भारी आयडिया ची कल्पना. मग हे बरेच ठिकाणी सुद्धा बघायला मिळालं, कारणं सुटसुटीत पणा. पण खरं सांगायचं झालं तर त्या मागचं मला आढलेल कारण थोडसं वेगळं आहे. जरी घरी खोल्यांमधे व्यवस्थित जागा असली तरी देखील भिंतींवरचे मेज आणि पलंग करून घेतलेले दिसतात. आताशा आई-वडील दोघे पण दिवस भर कामाला जातात दोन दिशेला. बाई जरी घरकामासाठी ठेवली तरी तिचा संबंध फक्त फरशीपुरता मर्यादित. बाकी आवरासावर हे सगळं त्या घरी राहणाऱ्यांची जबाबदारी. वेळेचा अभाव आणि त्यात जर पलंग सतत नेहेमीसारखे जमिनीवर उभे ठाकले तर त्यावर न कळत वस्तू ठेवल्या जातात आणि येता - जाता पडावंसं वाटत ते वेगळंच. आळशी होऊ शकतो त्यामुळे व्यक्ती आणि ह्या अश्या पसरलेल्या पलंगाकडे बघून उत्साह मावळतो, थकवा कदाचित अजून जाणवतो आणि मरगळ येते ई. तेच अगदी तेच आहे खाण्याच्या मेज च देखील, आपला सखा डायनिग टेबल हो. लोणची, चटण्या, मीठ, पाणी, चमचे, डब्बे आणि इतर वस्तू त्यावरच विराजमान, धुळीबद्दल न बोललेलंच बरं कारण आपला देश हा अंडर कॅन्स्ट्रुक्टशन देश आहे, आजूबाजूला सातत्याने बरीच बांधकामं चालूच असतात अविरत. त्यात घरचे सगळेच सकाळी लवकर बाहेर पडणार चारी दिशांना. ह्या सगळ्या कारणांमुळे मेज आणि पलंग भिंतींवर चढवले कि खोली मोठी, आवरलेली तर दिसतेच पण आळस शिरत नाहीच अंगात. ज्याच्या सुपीक डोक्यातून हि भन्नाट कल्पना साकार झाली आहे त्यांना शतशः धन्यवाद.
मंगळवार, ८ मार्च, २०२२
भिंतीवरचे मेज आणि पलंग
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा