बुधवार, ३० मार्च, २०२२

नातं

) सिरीयल मी का बघते टीव्ही वर? हा मला विचारला गेलेला प्रश्न अनेक वेळा अनेक लोकांनी. ह्या न्यू नॉर्मल दिवसात तर स्क्रीन टाइम इतका वाढला आहे कि पुन्हा अजुन एक स्क्रीन नको वाटते. पण आताशा मी फक्त एक सिरीयल आवर्जून बघते / ऐकते १५-२० मिनिट, तेवढंच मला नवीन दागिने दिसतात, नवीन फॅशन समजते, भिंतीवरचे रंग / सजावट बघायला मिळते, काही वेगळे चांगले शब्द / वाक्प्रचार . ऐकायला मिळतात . अनेक कारणं आहेत.

 ) बाबांचे बूट मुलाला यायला लागले कि वडिलांनी मुलाला दोस्त समजावं म्हणे? समजावं? आणि हे फक्त मुलगा आणि वडील ह्यांनाच का लागू हो? आई मुलीला का नाही?

तर त्याचं असं झालं कि परवा मी एक सिरीयल बघत होते त्यात आई आणि मुलीचा संवाद सुरु होता.

मुलगी: "आई मला खूप आवडलं तू माझ्या घरी राहायला आलीस, तू खूप कामं करतेस आणि उगाच म्हणायचं म्हणून नाही बरं का, मला खरंच बरं वाटतंय"

आई : "अगं एकदा का मुलगी मोठी झाली, शाळा कॉलेज ऑफिस ला जायला लागली, बाहेरच्या जगात वावरायला लागली, कि मग सगळे नात्यांचे बंध गळून पडतात आणि मग संवाद सुरु होतो तो फक्त दोन मुलींमधला".

अहाहा , कित्ती गोड आणि सुंदर मला तर ते वाक्य इतकं म्हणजे इतकं आवडलं कि ज्याचं नाव ते. मित्र समजा / मैत्रिणी समजा कशाला, जरा त्या पुढे जाऊया कि.

मागल्या वर्षी माझी एक विद्यार्थिनी विद्यावाचस्पती झाली. आम्ही सोबत तब्बल + वर्ष घालवली, सूर जुळले, ह्या प्रवासात संशोधन पेपर्स झाले, पेटंट्स झाले, ग्रँट्स मिळाल्या . काल आमच्या कामाला अजुन एक अवॉर्ड मिळालं KPIT कडून, त्या साठी अभिनंदन करण्यासाठी मी फोन केला होता तेव्हा मी म्हटलं, आता फक्त दोन मुलींमधला संवाद होणार ह्या पुढे, कुठलेही नात्याचे बंधन नकोच, कुठलेही नाव नको, एकत्र सफर करू या, बास. अगदी तसेच माझ्या लेकी सोबत पण मी प्रकर्षाने सांभाळणार आहे ह्या पुढे, आत्ता पर्यंत मी तिला मैत्रीण ह्या पठडीत बसवत होते पण ह्या नंतर एक पाऊल पुढे जाणार. अर्थात ती माझ्या पेक्षा १०० पाऊलं पुढे आहेच आधीच, पण ही नवी दिशा / नवा दुर्ष्टीकोन प्रचंड आवडला आहे मला. मस्तच फायदा झाला मला ते सिरीयल बघितल्याचा. अहाहा .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...