पंजाबी पगडी किंवा महाराष्ट्रीयन फेटा हि एक शान आहे, त्याचा एक मान आहे आणि ते बांधणं हि एक कलाच आहे, माझ्या दृष्टीने. १६-१७ वर्षांपूर्वी पगडी बांधायचे नियम मी ऐकलेले, अनुभवलेले ते वेगळेच होते आणि आता फार शिथिल झाले आहेत असं जाणवतं. हा बदल बऱ्याच कारणांमुळे घडला असेल, एक तर ती पडगी सांभाळणं एकंदरीत वेळ खाऊ प्रकार. ते खूप शांतपणे करण्याचं काम आहे आणि त्यात रस पाहिजे. सध्या कोणालाच वेळ नाही आणि तेवढं मोठं कापड सांभाळणं, दुसऱ्याला बांधून देणं / घेणं अवघड आहे, विभक्त कुटुंब पद्धतीमधे. सध्या पगडीची जागा टोपीने घेतली आहे. इलॅस्टिक कापडापासून तय्यार केलेली टोपी. ती घालायला काढायला अगदी सोप्पी, दुसऱ्यावर विसंबून राहायला नकोच आणि सांभाळायला फार सहज. तशीच टोपी सगळे बहुतांशी तरुण, विद्यार्थी, वसतिगृहात राहणारे ई. वापरतांना दिसतात आजकाल. टोपी घातली आहे, पडगी च्या ऐवजी पण केस कापले नाहीत, हे हि नसे थोडके, असं म्हणायला हरकत नाहीच. टोपी हा सहज साध्य उपाय असला तरी ती पगडीची शान टोपीत नाहीच. तो रुबाब कुठेतरी हरवल्यासारखा वाटतो. पण "कालाय तस्मै नमः", प्रवाह पतित होणं फार आवश्यक आहे सध्याच्या काळात. इच्छा असून देखील सगळं साध्य होत नाही सर्वांना. पगडी / फेटा ह्या मुळे होणारे फायदे, केस न कापणे हि रीत, ते लहानपणीपासून झालेले संस्कार, पिटुकल्या पगडी तस्सम पासून झालेली सुरवात ई. एका बाजूला आणि आजकाल उगाचच फॅड म्हणून केस वाढवणारे तरुण किंवा कुठल्याही वयातली माणसं हे दुसऱ्या. वाढवलेले केस शोभून दिसत आहेत नाहीत, काही घेणं देणं नसतं त्यांना. एखाद्या कलाकाराने त्याच्या कलेच्या साधनेकडे संपूर्ण लक्ष दिल्यामुळे वाढलेले केस हे वेगळं, पण उगाचच नको.
पुण्यात किंवा महाराष्ट्रात तय्यार फेटा विकत मिळतो, तशी पगडी पण उपलब्ध असेल ना बाजारात, मग शोधा. तो कदाचित जास्त चांगला पर्याय ठरेल टोपी शिवाय, असं मला वाटतं.
मी असंख्य जणांना पगडी ते टोपी असा बदल आत्मसात करतांना बघितले आहे गेले अनेक वर्ष. पण एक विनंती आहे, जेव्हा जमेल तेव्हा पगडी किंवा फेटा आपल्या आप्तस्वकियांकडून बांधून घ्याच. मला अनुभव नाही पण पगडी बांधणं किंवा फेटा हा एक सुंदर पर्याय आहे आपल्या माणसांसोबत वेळ घालवण्याचा. असा
उत्कृष्ट "क्वालिटी टाईम" एकमेकांच्या सानिध्यात घालवण्याची संधी कदापि
दवडू नकाच. तो एकत्र उत्तम वेळ, ती स्पंदन, त्या गप्पा (कदाचित शब्देविण
संवादू) अनुभवा, साठवून ठेवा आणि अश्या उत्तम आठवणीत रममाण व्हा नेहेमीच. कुठलंही नातं असो ती बांधण्याकरीता लागणार बराच वेळ हा काही महत्वाच्या संभाषणासाठी उपयोगी पडत असावा नक्की. अर्थात तेव्हा आधीच्या काळी / सोसिअल मिडिया यायच्या आधी दोघे (mom dad, husband wife etc) कामाला जात नव्हते, शांतात होती, ई.
पण आता काळ बदलला आहे त्यामुळे ह्या सगळ्या सोई : पगडी ऐवजी टोपी.
शुक्रवार, २० मे, २०२२
पगडी ते टोपी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा