परवा मी आमच्या एक्साम कक्षात गेले होते काही प्रिंट्स घेण्याकरता, परीक्षा येऊ घातली आहे त्यामुळे त्याचे पेपर्स प्रिंट करायचे होते. त्या विभाग प्रमुखांची रीतसर परवानगी घेऊन पोचले आणि दिल्या कि प्रिंट्स. २०-२२ पानं होती माझ्या मते एका गठ्यात आणि असे दोन गठ्ठे प्रिंट करायचे होते. पण म्हटलं आधी फक्त एक गठ्ठा प्रिंट कर अशी विनंती करू या, अहो हो आजकाल विनंति / हात जोडणं ई. फार म्हणजे फारच महत्वाचं आहे, तब्बेतीला चांगलं असतं. आणि प्रिंट दिल्यावर थोड्याच दूर ठेवलेल्या प्रिंटर पाशी मी पोचले तो गठ्ठा घेण्यास आणि जे आढळलं मला ते खूप वेगळं होतं. ती कागदं मला क्षणभर पण माझ्या हातात धरता आली नाहीत हो, इतकी तापली होती. तो अनुभव इतका वेगळा होता कि माझ्या मते तो प्रिंटर तापला नाही प्रचंड संतापला होता. इतकं संतापणं योग्य नाही प्रकृतीला अजिबातच. दुसरा गठ्ठा तोवर प्रिंट दिला गेला होता, त्याची पण अगदी तीच गत. छे छे. काही तरी औषोधोपचार प्राधान्य देऊन, उच्च विद्याविभूषित डॉक्टर बोलावून करून घेतले पाहिजेत त्या प्रिंटर चे. नाहीतर लवकरच.........
आणि मुख्य म्हणजे मी मागे एकदा नमूद केल्या प्रमाणे माझ्या बाबांचं वाक्य मला प्रकर्षाने आठवलं, ते माझा चेहेरा कधी मलूल झालाच तर म्हणायचे "काय होतयं"?, मी: "बाबा ताप आलाय, किंचित" किंवा "तपासारखं वाटतंय", त्यावर त्यांच चपराख उत्तर तय्यार असायचं "तापचं आला आहे ना, मग गोळी घेतला कि उतरेल, आराम कर, संताप नाही ना मग मिळवलं, त्याला कुठलंच औषध नाही ग बाजारात". बास, हे ऐकल्यावर कुठला ताप उरतोय, चट्टकिनी उतरून जायचाच.
त्यामुळे हा किंवा कुठलाही प्रिंटर / माणूस / अजून कुठले अवजार फक्त तापाने त्रस्त आहे ना ह्याची खात्री करा, संताप परवडणारा नाही आहे. आणि हो स्वतः देखील ताप येऊ न देणे आपल्या हातात नाही, संताप येऊ न देणे तर आहे ना. मग चला तर मंडळी संतापाची देवाण घेवाण नकोच आज पासून, आत्ता पासून.
बुधवार, २५ मे, २०२२
तापलेला नाही, संतापलेला
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा