मला भांडी घासण्याचा प्रक्रियेची जेव्हा ओळख झाली तेव्हा लिंबू-मीठ, वीट, राख, चिंच ई. गोष्टी पण वापरात असायच्या साबणाशिवाय. कारण त्यावेळी बहुतांशी भांडी हि पितळेची, तांब्याची किंवा लोखंडाची असायची. त्यामुळे ह्या गोष्टी फार उपयोगी पडायच्या. नारळाची शेंडी पण घेतली जायची घासणी म्ह्णून. मग हळू हळू अनेक उद्योग उतरले ह्या क्षेत्रात आणि घासणी, भांड्यांचं साबण ई. मधे विविधता दिसायला लागली. आधी स्पॉन्ज आला, मग थोडी खरखरीत प्रकारची चौकोनी / आयताकृती अशी, मग स्पॉन्ज एका बाजूला + खरखरीत दुसऱ्या अशी, मग स्टील ची गोल, फळांच्या आकाराचे, हातात सहज धरता यावेत असे बाजूने किंचित गोलाकार दिलेले, ब्रश सारखे, वैविध्य रंगांचे, जाडीचे, प्लास्टिक चे, वाकड्या मानेचे, अगदी पलंगाच्या आकाराचे सुद्धा आणि अनेक असे प्रकार झाले.
परवा मावशींनी आरोळी ठोकली, भांड्यांचं साबण संपायला आलयं अशी आणि मग मी जाऊन घेऊन आले. दुसऱ्या दिवशी मावशीच गायब, मग मी झाले तात्पुरती मावशी. म्हटलं कशाला उगाच उरलेलं तोडकं साबण वापरायचं नवीन काढूया, सरते शेवटी मी उतरले आहे मैदानात भांडी घासायला कित्येक वर्षांनंतर. शिस्तीत साबणाचं पॅकिंग उघडते तो काय अहो आश्चर्यम. घासणी कडे मी बघतच राहिले. कारण गेले काही वर्ष साबणाच्या मोठ्या पॅक सोबत घासणी पण देतात. तो आकार बघूनच मी त्याच्या प्रेमात पडले हो अक्षरश:. कोणाच्या म्हणताय? अहो त्या घासणीच्या, आकाराच्या, ज्याने हे डोकं लावलंय त्याच्या ई. अश्या घासण्या दिल्या तर मनापासून काम होणारच ह्यात शंकाच नाही हो. कसं काय सुचलं असेल कोणास ठाऊक. अगदी शुल्लक गोष्ट पण परिणामकारक अशीच. "बदल हाच स्थिर असतो" म्हणतात हे कित्ती खरं आहे ह्याच प्रत्यंतर आलं मला. साधं भांडी घासण्याचं साबण ते, पण तेथे देखील इतका वेगळा विचार. आवडलं मला. इतक्या रंगबिरंगी, नाजूक हातांना विचारात घेऊन, लहान मुलांना देखील शिस्त लागावी म्हणून निघालेले, भारतीय आणि विदेशी बनावटीचे असंख्य घासणीचे प्रकार अनुभवले पण घरची भांडी, घरच्यांसाठी जेवण ज्यात प्रेमाची फोडणी देऊन तय्यार केलयं, मग घराचा आकार असलेली घासणी दिली गेली तर, वा म्हणजे वा च. मज्जा आली. वेगळा विचार केल्याबद्दल धन्यवाद, अगदी मनापासून आणि अजून एका प्रकारे घराला घरपण दिल्याबद्दल.
मंगळवार, २४ मे, २०२२
घासणीचा आकार
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा