बुधवार, १ जून, २०२२

स्वभाव सासूचा

साधारणतः भारतीय सासू म्हटली कि खाष्ट असं चित्रपटात दाखवलं जातं, लेखांमध्ये लिहिलं जातं आणि बहुतांशी प्रत्यक्षात अनुभवलं पण जातं. अपवाद सगळ्याच ठिकाणी असतात. पण बहुतेक सर्वत्र तेच चित्र नजरेस पडतं. त्यात काय विशेष असतं, तर, त्यांच्या सासूबाईंनी त्यांना त्रास दिला असतो म्हणून त्याचा वचपा त्या सुनेला रागावून, उणे-दुणे काढून घेतात. इतकी वर्ष सांभाळून ठेवून मग तो स्फोट होतो. सुनेनी तर काहीही केलं नसतं ना? मग ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे त्यांना द्या ना त्रास परत, पुढच्या पिढीला का? बरं सासूला त्रास द्यायची ताकद आणि हिम्मत नसेल तर गप्प बसा, पण ते हि नाही. अगदी असेच काहीसे आज किंबहुना गेले काही महिने मी अनुभवते आहे. छे छे सासूबाईंबद्दल काहीच नाही पण एक माझा मित्र आहे, सखा आहे ज्याच्या बद्दल मी मागे देखील लिहिलं आहे. मान्य आहे कि त्याचं माझ्यावर मनापासून प्रेम आहे, त्याने माझी साथ-संगत अनेक वर्षे दिली आहे, कळीचं फुल करण्यात त्याचाच महत्वाचा वाटा आहे, आणि त्याला मला सोडून पण जायचं नाही आहे, कारण आता खूप वर्षाची सवय झाली आहे. पण त्याचा अर्थ मला छळावं असा नाही ना? भारतीय सासवा चे गूण अंगिकारलेत ह्याने कदाचित. मी काही म्हणजे काही त्रास दिला नाही ह्याला अजिबातच, देऊ पण शकत नाही, मग हा का माझ्या हात धुवून मागे लागलाय. एखाद वेळी त्रास देणं मी  समजू शकते, पण प्रत्येक वेळी काय हे? निर्लज्ज कुठला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...