बुधवार, १ जून, २०२२

मजबुतीका जोड

पायात घालायच्या चपला एका ठराविकच पद्धतीने तय्यार केल्या जायच्या आधी च्या काळी. त्यात खालचं सोल, मग त्यावर पट्टा आणि तो पट्टा त्या सोल मधे खाचा करून आत घालून व्यवस्थित शिवलेला असायचा. ती शिवण दिसायची नाही बाहेरून. पण पट्याची मजबुती हि तो आत घालून शिवण्यातच झाकली गेली असायची. मग काही वर्षांनी एक भलतीच फॅशन निघाली, मोठ्या आकाराचा धाव दोरा बाहेरून शिवलेला दिसायचा. म्हणजे पट्टा आतच पण शिवण बाहेरून. पण काहीका असेना त्यावेळी चप्पल रस्त्यात तुटणं फारच कॉमन होतं / अगदी सगळ्यांसोबत सर्रास व्हायचं. त्यामुळे सर्वत्र मोची दिसतं, आजकाल शोधावे लागतात, कमी झालेत फार. असो. आणि काही दिवसांपूर्वी मी उत्साहात गेले नवीन चपला खरेदी करण्यास आणि बघते तर काय पट्टे, खाचा, शिवण, सगळंच गायब, पूर्णपणे. बापरे. म्हटलं मग आता काय नवीन शोधून काढलंत. तर आता पट्टे मोठे आणि बाहेरूनच म्हणे आणि ते देखील चिपकवलेले, शिवलेले नाही. आणि ह्या आधुनिक फॅशन ने ओतप्रोत भरलेल्या चपलांचे सोल पण चामड्याचे नाही म्हणे तर कुठल्यातरी वजनाने हलक्या साहित्याने तय्यार केलेले. "प्रवाह पतित होणं" अत्यावश्यक आहे पण हे खाच +  शिवण ते चिटकवणे फक्त हा प्रवास जरा भलताच आहे, माझ्या करता. म्हणजे चपलाच नाही तर बाकी सगळं पण जरा ठिगळ लावलेलं, तात्पुरतं, वापरलं कि बदललं आणि दुसरं घेतलं असं झालयं फॅशन च्या नावाखाली हो. पण जे आहे ते आवडण्यासारखं आहे, विविध प्रकार घालता येतात त्यामुळे सध्या आणि मिरवता पण मस्त येतं. त्यामुळे आने दो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...