सोमवार, ६ जून, २०२२

शिकवणे हि एक कलाच

ज्यांना अतिशयच उत्कृष्ट, वेगळ्या धाटणीतले शिक्षक त्यांच्या लहानपणी शिकवायला असतील आणि ते विद्यार्थी सध्या जर शिक्षकी पेशात असतील तर ते देखील उत्तम शिक्षक असतील ह्यात शंकाच नाही. किंवा नाण्याची दुसरी बाजू म्हणजे जर फारच विचित्र किंवा टोकाचे शिक्षक असतील तर कसं शिकवायचं नाही हे आताच्या शिक्षकांना नक्की समजलं असेल. तर असे दोन प्रकारचे शिक्षक सध्या नजरेस पडतात. किंवा दोन प्रकारची माणसं असतात म्हणायला हरकत नाही, एक जे आजूबाजूच्या सगळ्या सजीव आणि निर्जीव वस्तू आणि व्यक्तीशी संवाद साधतात. आणि अजून एक प्रकार असतो तो म्हणजे त्यांना स्वतःशी सुद्धा बोलता येत नाही, संवाद साधणं तर फारच दूरची गोष्ट झाली. मग असे हे त्या विषयातले विद्वान त्यांच्या पद्धतीने, विद्यार्थ्यांच्या पातळीवर जाऊन कसे काय समजावून सांगणार?. नुसतं हुशार असणं हे पण फारच उत्कृष्ट आहे, पण सगळेच हुशार शिक्षकी पेशात येऊ शकत नाहीत किंवा टीक धरून ठेवू शकत नाहीत. खूप गोष्टी सांगाव्या लागतात, सोप्प करून सांगावं लागतं, विविधता लागते प्रत्येक वेळी नवीन विषय / मुद्दा हाताळतांना. प्रत्येक वयाच्या विद्यार्थ्यांना हे द्यावंच लागतं. प्रत्येक वर्गात अनेकविध प्रकारचे विद्यार्थी असतात, काही ऐकून, वाचून, बघून, चर्चा करून किंवा स्वतः करून मग शिकणारे. सर्वांना समजेल / उमजेल असं शिकवावं लागतं. महाविद्यालयात किंवा विद्यापीठात शिकवायचं आणि ते देखील आजच्या काळात म्हणजे नवीन विषय पण येतात नेहेमीच शिकवायला. ते अजून एक आव्हान असतं.  पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवलं कि शिकवणे हि एक फार मोलाची कलाच आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...