"माझा चार्जर" हि संज्ञा आपण दररोज कित्येकदा कळत - नकळत वापरतो. किती भलं होईल नाही जर असा एखादा चार्जर अस्तित्वात असेल तर? खरं तर आपण मोबाईल चा / लॅपटॉप चा चार्जर असं म्हणत असतो पण सवयी नुसार "माझा चार्जर..." अशी सुरवात असते. असो.
आपण सर्वच जणं आताशा थोडेसे जास्त थकले आहोत असं सर्वांनाच जाणवायला लागलं आहे. कारणं काही असोत, ती प्रत्येकाची आपली वेगळी आहेत, असणारच कारण डीएनए, क्षमता, ताकद, कामाचं स्वरूप ई. भिन्न आहे. सर्वच आपल्या परीने प्रयत्न करतात, कोणी व्यायाम, तर बाकी पौष्टीक आहार, तर कधी आराम, ई. तरी देखील हवं तसं ताजतवानं वाटतं नाही. चला तर मग खालील छोटेसे काही उपाय करून बघुयात, कदाचित सदुपयोग होईल. "प्रयोगातून विज्ञान आणि निकाल / फळं / परिणाम..." ई. ची प्राप्ती होईल आणि थकवा छू मंतर. थोडा वेळ द्यावा लागेल, सबुरी ठेवावी लागेल, लागलीच मला किंवा ह्या उपायांना तराजूत तोलू नका. निष्ठेने सुरु करा आणि स्वतः च स्वानुभव घ्या.
- "पी हळद होऊ गोरी" हे होणे नाही
- मल्टीविटामिन गोळ्या तज्ज्ञांच्या सल्ल्याने सुरु करा, थकवा जाणवतो = काहीतरी कमी आहे शरीरात, ती भरून काढली पाहिजे वेळेत
- हलकासा व्यायाम करा, योग करा, दमवू नका आणखीन स्वतःला परदेशी व्यायाम प्रकार अवलंबून
- थोडासा आराम करा
- फक्त स्वतःच काम करा, दुसऱ्यांच्यात लुडबुड नको, उगाच डोक्याला जास्त ताण
- एखादा छोटासा छंद जोपासा,
- काम म्हणून नाही तर आवड म्हणून एखादा खास पदार्थ करा, बागकाम करा
- मुलांसोबत, आप्तस्वकियांसोबत हसा, थोडा वेळ घालावा
- पत्ते खेळा आवडत असल्यास
- शांतपणे जेवा, आनंद घ्या
- प्रत्येक एक तासाला छोटा ब्रेक नक्की घ्या, छोटा म्हणजे १ मिनिटाचा, पण नक्की (हे शास्त्रोकरीत्या सिद्ध झालेलं आहे, अधिक माहिती करीत वाचा : http://www.just-a-minute.org/en/about/)
- साधी दोरी किंवा इलॅस्टिक / रबर ला सातत्याने ताणून धरलं तर ते तुटतं, निर्जीव वस्तू असून देखील, तुम्ही-आम्ही तर हाडामासाची माणसं आहोत, आपले डोळे हा फारच नाजूक अवयव आहे, मान मोडे पर्यंत संगणक आणि तदनंतर मोबाईलच्या स्क्रीनकडे बघून देखील थकायला होतं, सर्वात जास्त थकण होतं ते बोलण्याने, सर्वात जास्त ऊर्जा वाया जाते ह्या कृतीने. त्यामुळे हवं तेवढं कामापुरतं नक्की बोला, जास्तीच, वायफळ टाळा.
- स्वतःला सांगा कधीतरी "आय एम फिसिकली फिट आणि मेंटली स्ट्रॉंग"
- स्वतः वर प्रेम करा
- स्वतःसाठी एक मिनिट द्या दिवसातून कधीतरी
- स्वतःला गुड मॉर्निंग म्हणा
- "when you have enough of screen look at green", look outside, the nature, take a walk or alike etc.
- छानशी साडी, ड्रेस, कपडे घाला, महागाचेच नाही तर आवडीचे, नक्की प्रसन्न वाटेल etc. to name a few....
हे सर्व नाही पण काही थोडेसे उपाय करून तर बघा मज्जा येईल आणि अजून तुमचे असे नवनवीन इलाज / तरीके / पद्धती ई. सुचतील आणि आणखीनच मज्जा येईल, थकवा नक्कीच छू मंतर, नेहेमी करता. विश्वास ठेवा. हे सगळं टप्प्या टप्प्याने मी स्वतः वापरूनच हि अनुकथा येथे कथन करत आहे.
थोड्याच दिवसात / महिन्यात माझ्या आजूबाजूच्या पऱ्या नक्की टवटवीत, अजून ताज्यातवान्या शक्ती - स्फुर्तीने परिपूर्ण झालेल्या मला दिसतील ह्याची खात्री आहे. आमेन.
Mastch
उत्तर द्याहटवा