जगप्रसिद्ध, बहुउपयोगी, स्वास्थ्यवर्धक अशी हि वडाची पुजेचा खास दिवस आज. त्या निमित्याने ऑफिस ला जाता जाता वडाला ह्यांच्या दिर्घायुष्याबद्दल हात जोडले, भरपूर नैसर्गिक प्राणवायू सातत्याने पुरवल्या बद्दल त्याचे धन्यवाद मानले आणि सर्वांना सुधृढ ठेव अशी मनःपूर्वक प्रार्थना केली. वडाच्या झाडापाशी पोचले तर वेगळंच दृश्य नजरेस पडलं. खूप मुलं म्हणजे ३०शीतली वडाच्या पाराजवळ खूप कामात व्यग्र दिसली म्हटलं झालं तरी काय? कोणी राजकारणी आला का? किंवा अजून काही. माझ्या गतीने माझी गाडी उभी केली तिथवर पोचेपर्यंत मला पोटभर हसता आलं. ज्यांच्या मुळे हे सहज शक्य झालं त्यांना मनापासून धन्यवाद.
वडाच्या झाडाच्या सानिध्यात ठराविक प्रदक्षिणा घालणे, त्या वटवृक्षाच्या छायेखाली काही काळ उभं राहणे आणि ते देखील ऋतू बदलाच्याच वेळी, हे का? आणि हे फक्त महिला / मुली ह्यांनाच आवश्यक आहे का सर्वांसाठी उपयोगी? तर प्रचंड प्राणवायूचा साठा ह्या वृक्षापाशी आठळतो. काही क्षण, ११ / २१ प्रदक्षिणा करत असतांना जो स्वच्छ शुद्ध प्राणवायू आपण सेवन करतो तो क्रतू बदलतांना आणि वर्षभर देखील साथ देतो, सुधृढ ठेवतो त्या व्यक्तीला. वड हा वृक्ष सातत्याने फक्त देत असतो, त्याच्या प्रत्येक भागाला महत्व आहे, त्याचा उपयोग आहे, हे असे असंख्य वडाचे गूण प्रत्येक व्यक्तीने अंगीकारावं ह्या करता आज आणि जमेल तेव्हा (बुस्टर डोस आवश्यक असेल तेव्हा) ह्या वटवृक्षाच्या सानिध्यात थोडा वेळ व्यतीत नक्की करावा सर्वांनी, फक्त स्त्रियांनी नाही. प्रत्येकाच्या विचारसरणीत ३६० अंशाचा फरक नक्की दिसेल/ घडेल.
ह्या सर्व काल्पनीक, माझ्या डोक्यात सुरु असलेल्या विचारांचं ज्वलंत उदाहरण आज माझ्या नजरेस पडलं. मला आज हि अनुकथा लिहायची होती, वडाची पूजा का करायची? कोणी करायची? ई. त्याची तय्यारी कालपासूनच सुरु होती, आणि मला असं वाटलं होतं कि मी जे लिहिणार ते नवीन आणि खास असणार. पण छे हो, ह्या तरुण पिढीनी तर माझी विकेटच उडवली. कित्ती उत्साहाने फोटो काढणं सुरु होतं, व्हिडिओ तय्यार केला जात होता, काहीजण तान्ही बाळं सांभाळत उभी होती तर बाकी साडी+दागिने+गजरा+पूजेचं सामान ई. सहित स्वतःला सावरत कारचं दार उघडणं अशक्य म्हणून दार धरून उभे होते, अहाहा च. देवा, कित्ती उत्कृष्ट दृश्य होतं ते. मी जाणूनबुजून थबकले, थांबले, सर्व डोळ्यात साठवलं आणि मग गाडीत बसले ऑफिसला रवाना व्हायला. दृष्ट लागण्यासारखं होतं सर्व. माझ्या डोक्यात आलेले सर्वच प्रत्यक्षात अमलात येत होतं, हे बघून डोळ्याच्या कडा ओलावल्या हे नक्की. आधी फक्त महिला आजची पुजाअर्चा करायच्या, उपासतपास आग्रहाने अंगिकारायच्या. त्यानंतर मधला एक काळ असा आला कि ज्यात पुरुष वर्ग देखील उपास करू लागले, पण त्यानंतर सर्वांनाच वैज्ञानिक महत्व पटलं आणि आजचा सुदिन माझ्या दृष्टीस पडला. हा सर्वांचा उत्साह असाच नेहेमी टिकून राहावा हे मनापासून मागणे "त्याला" / वटवृक्षाला. आमेन.
तर अशी हि आधुनिकतेची झालर, साज चढलेल्या वटपौर्णिमेची साठा उत्तराची कहाणी सफल संपूर्ण.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा