आपुलकी, जबाबदारी, जिम्मेदारी, जिव्हाळा, काळजी ई. अनेक समानार्थी शब्द आहेत एका इंग्लिश इंटरेस्टींगनेस ह्या वाक्यांशाचे / फ्रेज चे. ह्या इंटरेस्टींगनेस ला घेऊन मी एक छोटसं संशोधन पण केलं होतं २०१४-१५ साली माझ्या एका खास विद्यार्थिनी सोबत. सुदैवाने किंवा योगायोगाने त्या वेळी देखील हे वाक्यांश चारचाकीशी निगडित होते. आज देखील मी ह्या बद्दलचं लिहिणार आहे. संशोधन करत असतांना हे ध्यानात आलं कि जर गाडीवान हा मालक असेल तर गाडीची सर्वदृष्टीने निगा राखली जाते, सांभाळली जातेच, पण जर भाडोत्री गाडीवान असेल तर मग काही विचारूच नका, हवं तशी गाडी हाकली जाते कारण ती गाडी घेण्याकरता गाडीवानाच्या खिशातली दमडी खर्च झाली नसते ना. असो. आजच नाही पण कित्येकदा मी हे अनुभवलं आहे, आज मी गाडी सोसायटीच्या बाहेर आणली तरी ड्राइवर नजरेस पडला नाही म्हणून मी त्यांना फोन केला, आले काही मिनिटात राव, म्हणून मी चालू गाडीचं त्यांच्या सुपूर्त केली आणि मी मागे जाऊन बसले. गाडीत पंखा चालू होता, रेडिओ चालू होता, सगळे कंट्रोल्स दिवे ई. देखील चालू होते. एकंदरीत काय गाडीचं चालू होती. हे आमचे नाममात्र / म्हणण्यापुरते / फुशारकी मारणारे दिग्गज ड्राइवर स्थानापन्न झाले आणि खटपट / धडपड करत / आवाज करत गाडी चालू करण्याचे प्रयत्न करू लागले. तळ पायाची आग मस्तकाला गेलीच नकळत माझ्या पण बोलून माझ्या तोंडाची वाफ दवडावीशी वाटली नाही मला कारण काहीच अर्थ नव्हता, पालथ्या घड्यावर पाणी. पाच इंद्रिये /ज्ञानेंद्रिय/ संवेदना अवयव सगळे भाड्याने दिलेत असं वाटलं मला त्या वेळी त्या ड्राइवरने. काय हे पोटातलं पाणी हालू देत नाही इतकी आरामदायी सर्वगुणसंपन्न अशी माझी ती राणी आहे, तिचे चालू असलेले सगळे कंट्रोल्स, दिवे, रेडिओचा आवाज आणि तिची हळुवार धकधक ऐकू येऊ नये हे दुर्भाग्यच. म्हणजे किती आपुलकीने कामावर येतो बघा हा माझा ड्राइवर. प्रचंड अवघड आहे. सध्या पायात माझ्या जोर नाही म्हणून अश्याना द्यावी लागते माझी राणी चालवायला. असो दिल्ली दूर नाही, मी लवकरच चालवेल माझी माझी राणी, नकोच असे हे धेडगुजरे लोक. ह्या छोट्याश्या प्रसंगांवरून हे निश्चित समजलं कि प्रत्येक गोष्ट, कुठलेही काम, कोणाचीही वस्तू प्रेमाने वागवा, वापरा, दुसऱ्यांसाठी नाही स्वतःच्या समाधानासाठी, उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी, ते सुरेख बंध निर्माण होण्यासाठी, अगदी आत्तापासून नेहेमी.
शुक्रवार, ८ जुलै, २०२२
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा