ह्या शब्दाचा जैसे-थे अर्थ बघितला तर साग्रसंगीत, एकत्र, गडबड, गोंधळ, घोळ किंवा असेच तत्सम. ह्या नावाचे दोन प्रकाचे पदार्थ पण आहेत, एक तांदळाची खिचडी आणि एक साबुदाण्याची. तांदूळ डाळ एकत्र करून एका विशिष्ट प्रमाणात, धुवून, भिजवून आणि मग सुंदर तुपात परतवून केलीली अशी. साधी पण करता येते, मसालेदार पण होते, मुगाच्या सालच्या डाळीसकट पण होते, सगळ्या डाळी मिक्स अशी पण होते, कधी थोडीशी मोकळी, काही हदहद (किंचित पातळशी), कधी स्पेशल भाज्या वगैरे घालून तर कधी वेगळ्या प्रांतात करतात तशी.... बाप रे यादी फारच मोठी आहे हो, अबब च किती ते प्रकार खिचडीचे, काही मूड प्रमाणे, काही वातावरणाप्रमाणे, कधी गरजेनुसार होणार, काही वेळेनुसार केलेले असे असंख्यच, प्रत्येक प्रकार प्रचंड चविष्ट, चवदार, पौष्टिक आणि पोटाला हलका असा. इतके गुण का आहेत ह्या खिचडीचे ह्याचं गमक आज मला प्रकर्षाने जाणवलं / उमगलं. खिचडी करण्याच्या सगळ्या टप्प्यांची ती खास कमाल आहे, त्यामुळे ती चव येते कारण सगळे जिन्नस एकत्र असतात पूर्णवेळ, अगदी कच्या स्थिती पासून ते गरगटा शिजेस्तोवर. संपूर्ण प्रोसेस इतकं आनंदाने ते उपभोगतात कि चव येणारच, पौष्टिकता मुरणारच, अगदी मोजमाप, एकत्र शिस्तीत धुणे, भिजवणे, तुपासोबत भाजणे, मसाल्यांसोबत शिजणे ई. म्हणजे पर्वणीच जणू, त्या सर्व जिन्नसांची. म्हणून करणाऱ्याला आणि सेवन करणाऱ्याला देखील मज्जा येतेच.
पण आजची खिचडी फारच भलतीच झाली होती, मूळ शब्दाच्या अर्थानुसार उगाच म्हणावी अशी खिचडी होती ती. काही तर गडबड होती हे नक्की. मग समजलं कि आमची मावशी कित्ती म्हणजे कित्ती हुषार आहे ते आणि थोडक्यात सगळं पटापट निपटवणारी अशी. आज मला सकाळी वरणभात-तूप-मीठ असं खायचं होतं आणि डब्यात खिचडी. तर ह्या मावशींनी काय केलं कि साधा भात वरण लावला कुकरला, मला थोडासा वरणभात काढून ठेवला आणि बाकी एकत्र करून दिली मला खिचडी म्हणून. काय हा शॉर्टकट, अशी असते का खिचडी? छे छे. असा दोनदा लागोपाठ वेगळ्या प्रकारचा वरण भातचं खाऊन माझं दुखणं तर फारच लांब पळून गेलं आणि मला अचूक, बरोबर, खरी खिचडी कशी व्यवस्थित होते ते उमगलं. खिचडीच्या प्रत्येक टप्प्याचं महत्व पटलं. उगाच नाही ह्या एका शब्दाचे अनेक अर्थ आहेत. असो. पुन्हा एकदा माझं लहानपण, पहिली दुसरी आठवली, यथेच्छ आईच्या हातचा वरणभात-तूप-मीठ भरभरून खायची, सर्वांची प्रकर्षाने आठवण झाली, नागपूरच्या घरची फेरी मारली गेली, अहाहा च. तर अशी हि खिचडीची साठा उत्तराची कहाणी सफल संपूर्ण.
शुक्रवार, ८ जुलै, २०२२
खिचडी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा