बुधवार, ६ जुलै, २०२२

हायफन

विद्यापीठ किंवा संस्थेची मान्यता देणारं मंडळ आहे, जे जगविख्यात आहे. मान्यता मिळवण्यासाठी काही नियमावली आहे आणि बरेचसे विविध निकष आहेत, ७ प्रकारचे. म्हणजे ७ भागात विभागलं गेलं आहे संपूर्ण विद्यापीठाचं किंवा शैक्षणिक संस्थेचं कार्य, थोडक्यात. त्यातला दुसरा निकष आहे शिकवणे-शिकणे. हे दोन्ही शब्द भिन्न आहेत, त्याचे मालक वेगळे आहेत तरी देखील ह्या दोन शब्दांना जोडणारा हायफन हा फार महत्वाचा असा आहे. अगदी छोटा आहे पण फार महत्वाचा असा. टिचिंग-लर्निंग किती एकमेकांशी संलग्न आहे हे तो हायफन दर्शवतो, प्रकर्षाने. शिक्षक आहे तर विद्यार्थी आणि वाईस व्हर्सा. त्यामुळे शिक्षकांचं सगळं कार्य हे त्यांच्या विद्यार्थ्यांसाठीच आणि विद्यार्थ्यांची सर्व धडपड हि शिक्षकाकडून शिकण्यासाठी. किती गोड जोडी आहे हे. तसेच दृढ संबंध, दृष्टिकोन आणि यशस्वी परिणाम दिसावे म्हणून दोघेही आनंदाने एकत्र सातत्याने काम करतात आणि खूप आठवणी निर्माण करतात. ज्याने कोणे हा हायफन अस्तित्वात आणला त्याला मनापासून धन्यवाद आणि "मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थी असतो" हे सर्वांनी नेहेमी लक्षात ठेवून एकत्र प्रवास करू या, नेहेमीच, म्हणजे जिंकलंच.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...