बुधवार, ६ जुलै, २०२२

हि चाल तुरु तुरु

हे खूप जुनं पण फारच भावणारं असं तारुण्यातलं गीत आहे, सध्या अर्धशतकी वयात असलेल्या बहुतांशी सर्वच तरुणांनी हे ऐकलं आणि गुणगुणलं असणारच असे. नागिणीच्या चालीची उपमा तरुण मुलीच्या लांबसडक वेणीला आणि त्या सोबत येणाऱ्या बऱ्याच सौंदर्य वृद्धिंगत करणाऱ्या गोष्टींना ह्या गाण्यात देण्यात आली आहे. आताशा लांबसडक केस हे थोडेसे दुर्मिळ झाले आहे, फार थोड्या प्रमाणात दिसतात सर्वत्र. त्याची कारणं बरीच आहेत. असो. एवढ्यातच काय झालं तर आमच्या ऑफिस मधे अनेक नवीन मजले बांधले गेले, त्यात एका मजल्यावर आम्हाला आमचा विभाग थाटायचा होता, त्यात एक खोली / केबिन माझी आहे. सध्या सगळंच नवीन आहे, स्थिरस्थावर होतंय त्यामुळे सगळ्या केबिन च्या किल्ल्या आमच्याचकडे आहेत. माझ्या केबिन च्या जाडजूड मोठ्या आकाराच्या तीन किल्ल्या आहेत. माझ्या नेहेमीच्या सवयीप्रमाणे त्या मी माझ्या आय कार्ड ला लावते इकडॆ तिकडे जातांना. गळ्यात लटकवलेले उभं आय कार्ड, त्याला लागलेल्या तीन किल्ल्या म्हणजे छमछम आवाज आणि ह्या जुन्या गाण्याची आठवण येते. कारण हि पण एक नवीन पद्धतीची चाल तुरुतुरु च असल्याचा मला भास होतो जेव्हा आय कार्ड मी चालते वेळी इकडून तिकडे माझ्या लयीने हलतं. अहाहा च.  

वेणी मागोमाग येते लयीत, पण ह्या किल्य्यांचा जुडपा दिशादर्शक असल्याचा मला भास होतो कारण तो सतत माझ्या पुढे लयीत / ठेक्यात चालत असतो. उठता बसतांना वाकतांना आणि प्रत्येक हालचालीत सुमधुर साथ देतो. अर्थात मोकळं "केवड्याचं वन..." नाही तर बंद  वातानुकूलित मजला आहे त्या ऐवजी. पण असो, हि नावीन्याने भरपूर चाल काही दिवस मी नक्की पोटभर एन्जॉय करणार आहे / करते आहे हे नक्की.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...