मला नक्की आठवत नाही पण २००७ पासून नक्कीच मी त्या दोघांना बघितलं आहे. आताशा तर रोजच दर्शन होतं, कधी कधी तर दिवसातून दोनदा देखील. घड्याळाचे काटे एक वेळ इकडे तिकडे होतील पण हि दोघ फारच वक्तशीर / शिस्तबद्ध. ह्यांच्या बद्दल बोलावं तेवढं माझ्यासाठी फारच कमी आहे. आणि फक्त वेळ नाही बरं का, तर कामाला पण अगदी वाघ आहेत दोघे. मितभाषी, कुठलीही पैशाची लालसा नाहीच, चहा-पाणी हि अपेक्षा असते हे त्यांना ठाऊकच नाही, खूप अदबीने बोलणार फोन वर आणि घरी आल्यावर देखील, चोख काम आणि इंचभर बदल नाही इतक्या वर्षात त्यांच्या वागण्यात, बोलण्यात, दिसण्यात, तब्बेतीत ई. आमच्या भागातल्या सगळ्या सिलिंडर आणि गॅस च्या तक्रारी जे चुटकी सरशी दूर करतात ते दोघे भाऊ, त्यांच्या बद्दल बोलते आहे मी. ८ च्या दरम्यान गॅस ची एजेन्सी पण उघडली नसते पण हि दोघ हाजीर दारात दुकानाच्या. सिलेंडर चा वास येत असेल किंवा लागत नसेल, किंवा स्टोव्ह दुरुस्त करायचा असेल फोन केला कि स्वारी हजर सांगितलेल्या वेळेला. तत्काल सेवा पण देतात. दोघे सख्खे भाऊ आहेत आणि ह्याच कामात. खूप म्हणजे खूप काही शिकण्यासारखं आहे त्यांच्या कडून. सातत्य, वेळेचं महत्व, कामाला दिलेलं प्राधान्य, रोजनिशीत नसलेला कंटाळा हा शब्द आणि हि यादी फारच मोठी आहे त्या दोघांच्या बाबतीत. आपण खूप मोठ्या पदावर काम करणाऱ्या लोकांना बोलावतो प्रेरणा द्यायला, माझ्या मते हि दोघे पण फार मोठे प्रेरणा स्रोत नक्कीच आहेत. मनापासून त्या दोघांना दंडवत आणि पुढे अनेक वर्ष त्यांची ऊर्जा आणि कार्य असंच अखंड चालू राहो हि प्रार्थना.
बुधवार, ६ जुलै, २०२२
वक्तशीर / शिस्तबद्ध
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा