मंगळवार, ५ जुलै, २०२२

पाऊल खुणा

माझ्या आईकडे खड्यांच्या महालक्ष्मी होत्या. त्यामुळे अगदी मला कळायला लागल्यापासून ते नंतर खूप वर्ष ज्या दिवशी लक्ष्म्या बसतात त्या दिवशी मी कुंकवाच्या पाउलांनी त्या दारातून घेऊन यायची आणि देवघरात ठेवायची. मग त्यांची पूजा आणि स्थापना होत असे. मग काही दिवस एक तर आईच फरशी पुसायची किंवा मावशींना सांगितले जायचे कि ती कुंकवाची पाऊल पुसू नका, किंबहुना ती पिटुकली / छोटीशी लाल रंगातली पाऊल खूपच सुबक दिसायची फरशीवर इकडे तिकडे उमटलेली अशी. अगदी माझ्या आईच्या भाषेत बोलायचं झालं तर जशी कि प्रत्यक्ष लक्ष्मीचं आली आहे त्या पाउलांनी अशी.  सासरी काही फारसे सण, व्रत, पूजा ई. खास नसल्यामुळे मग ह्या पाउलांबद्दल थोडसं विस्मृतीत गेल्यासारखं झालं होतं मला.

काही दिवसांपासून माझ्या घरी काम करणाऱ्या मावशीचं गणित थोडसं बिघडलं आहे. का कुणास ठाऊक? एक तर सकाळची अहो घाई मला आणि बरोबर मी जेथे जाते त्याच खोलीत त्या टपकतात पोछा घेऊन. कितीही पिळलं ते कापडं तरी देखील सध्याच्या पावसाळी हवेत फारशी पटदिशी वाळत नाहीच, त्यात पंखा पण नको वाटतो लावायला. ह्या सर्वांची गोळाबेरीज म्हणजे ओल्याच फारशींवरून इच्छा नसतांना फिरावं लागतं मला हळुवारपणे. तरी देखील पाऊलखुणा उमटतातच. मी सांगून दमले पण मावशींमधे अनुमात्रही बदल नाहीच. आज मला शेवटी त्या स्लिपरच्या खुणा / ठसे बघून माझ्या घरची प्रकर्षाने आठवण झाली. काहीही तुलना नाही पण तो जो मी फेरफटका मारून आले तो फारच उत्कृष्ट ठरला. इतक्यात ऑफिस मधे जबरदस्त पळापळ सुरु आहे, पण आज सकाळ इतकी चांगली झाली होती ना कि ऑफिस च्या कामांचं काहीच वाटलं नाही. खूप उत्साह जाणवला दिवसभर. काय ते रोजचे काम मावशीचे पोछाचे पण त्या कडे बघून भूतकाळात रममाण होता आलं मला ह्यासारखी दुसरी कुठली बाब असू शकते.

अश्या छोट्या छोट्या प्रसंगातून मावशींवर रागावण्या पेक्षा अश्या पद्धतीने देखील त्या कडे बघता येईल एक वेगळाच आनंद मिळवण्याकरता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...