मंगळवार, ५ जुलै, २०२२

असूरी आनंद

अशी आख्यायिका आहे किंवा पौराणिक / आध्यात्मिक ग्रंथांमधे अशी नोंद देखील आढळेल कि ह्या जगात तीन प्रकारच्या व्यक्ती आढळतात. एक देवासारख्या = देव गण, दुसऱ्या मनुष्य गण आणि तिसऱ्या राक्षस / असूर गण.  ह्या गणांबद्दल पत्रिकेत पण नोंद आढळते. आणि लग्न ठरवायच्या वेळी कमीतकमी हे बघितलं जातं कि जर मुलगा किंवा मुलगी मनुष्य गणाची आहे तर सोबती मनुष्य किंवा देव गणाचा असावा ई. आणि बरंच काही.

आपण असंख्य वेळा ऐकलं आहे अनेक माध्यमातून कि ऑनलाईन फसवणूक कशी झाली त्या बद्दल. आताशा जागरूकता म्हणून रेडिओ वर देखील सातत्याने जाहिराती येतात ह्या बद्दल. त्या जाहिरातींमधे तरुण मुलगी / मुलगा बोलतांना दर्शवलं आहे आणि असं म्हटलं आहे कि ते नागरिकांना लिंक दाबायला सांगतात, किंवा OTP सांगा म्हणून क्लुप्त्या काढतात, किंवा अजून बरेच काही. तेव्हा मला हे जाणवलं कि हि माणसं / तरुण मुलं / मुली हि अशी चुकीची कामं का करत असतील? त्यांची काय अडचण असेल? त्यांनी असा फसवेगिरीचा मार्ग का स्विकारला असेल? त्यांना काय मिळतं दुसऱ्यांना फसवून? ई. प्रश्नांची भाऊगर्दी झाली आहे डोक्यात. खूप खूप भंडावून सोडलं आहे ह्या प्रश्नांनी मला. हे असं काम करण्या ऐवजी दुसरं एखादं काम का नाही? शिक्षणाची कमी आहे का कामं नाहीत? का ह्या क्षेत्रात भरपूर पैसा मिळतो? कोणास ठाऊक. जर काही दबावाखाली किंवा मजबुरी म्हणून काही मंडळी ह्या कामात अडकली असतील तर त्यांनी प्रयत्नपूर्वक बाहेर येणं अत्यावश्यक आहे. कोणालाही फसवू नये. प्रत्येकाचे कष्टाचे पैसे असतात ते. प्रत्येकाकडे कारणे असतात ते पैसे वापरण्याची, कदाचित प्रचंड गरज पण असेल त्यामुळे असा डल्ला मारणं अजिबातच माणुसकीला धरून नाहीच. असूरी आनंद मिळतं असावा अश्यांना पण तो कोणाचेच भले करत नाही नेहेमीकरता. कृपया ह्या कडे लक्ष द्या. मेहेनतीला, खरेपणाला, सातत्याने कामं करण्याला कुठलाही पर्याय नाहीच, कुठलाही शॉर्टकट अजिबात नाहीच, कधीच. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...