कुठल्याही पलंगाला चार बाजू असतात चढ-उतार करायला सोपे म्हणून असेल कदाचीत. चढउतार फक्त त्यावर लोळण्याऱ्यांसाठी नाही तर बसणाऱ्यांसाठी किंवा तो पलंग वापरणाऱ्यांसाठी सुद्धा. बहुतांशी त्यातली एक बाजु हि उंच आणि भिंतीला टेकवलेली अशीच आढळते, कारण सर्वात महत्वाचं डोकं आणि ते ज्यावर पहुडतं ती उशी किंवा उश्या ठेवाव्या लागतात म्हणून. खूप ठिकाणी मोठी एक बाजू पण भिंतीला सरकवलेली असते, कदाचित जागेअभावी किंवा लहान मुलं असेल तर. त्यामुळे सर्वत्र एक तर दोन मोठ्या किंवा तीन बाजू मोकळ्या असतात येणं जाणं करायला. हवं तेव्हा, लागेल तेव्हा, सोयीचं असेल त्या बाजूने चढा उतरा. सहज माझ्या ध्यानात आलं कि हे असं का केलं गेलं असेल तर सोप्प आहे अगदी माणसाच्या नाते संबंधांसारखे. गरज असेल तेव्हा किंवा ज्या बाजूने चढणे / उतरणे शक्य असेल तसे सल्ले द्या, हजर राहा, बोला, नका बोलू, फक्त ऐका ई. मला इतकी वर्ष हे का उमगलं नाही ह्याचंच आश्चर्य वाटतं. जशी निकड तशी कृती अगदी पलंगावर केलेले चढ उतार सारखी. तो पलंग जसा मजबूत उभा ठाकलेला असतो, शांत झोप देतो, त्याची सवय झालेली असते प्रत्येकाला तसेच भक्कम उभे ठाका आपल्या लोकांसाठी, मैत्रीसाठी, अगदी शांत वाटायला हवं तुमच्याशी संवाद साधल्यावर.
शनिवार, २७ ऑगस्ट, २०२२
चार बाजू
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा