तसे तर सगळेच अवयव अतिमहत्त्वाचे असतातच, आणि अर्थातच त्यात गुढघे देखील आलेच. माझ्या आजुबाजुच्या काही आजी-आजोबांची गुढघ्यांची शस्त्रक्रिया झाली आहे एवढ्यातच. शस्त्रक्रिया तज्ञांच्या म्हणण्या प्रमाणे का कुणास ठाऊक पण दोन्ही गुढघ्यांच्या शस्त्रक्रिया एकाच वेळी करायला सांगतात, सल्ले देतात आणि करतात देखील. कदाचित एकाच वेळी काय तो त्रास होऊन जाऊ दे, असा त्यांचा दृष्टिकोन असेल किंवा दोनदा दवाखाना, दोनदा व्यायाम आणि बरेच काही पेक्षा एकदाच जुळ्यांचं दुखणं परवडलं, असं काहीसं असावं. असो. ऑपेरेशन नंतर घरचे तर जिवापाड जपतातच, शिवाय गोळ्या औषधं असतात, तज्ज्ञ व्यायाम करून घेणारे असतात, पण तरी देखील मला प्रकर्षाने जाणवलं कि ह्या सर्वांसोबत एखादा मानसिक उपचार तज्ज्ञ का नसावा जो दुखण्याकडे दुर्लक्ष करायला सुकर होईल असे उपाय सुचवेल, लक्ष काही वेळा करता का होईना पण दुसरीकडे वेधलं जाईल ह्या कडे बघेल, विविध बैठे खेळ / उपक्रम / ऍक्टिव्हिटीज ई. करून घेईल. अगदी लहानपणीचे रंगबिरंगी खडू देऊन चित्र रंगवायला सांगेल, गोष्ट ऐकवेल, बरेच किस्से सांगण्यास उद्युक्त करेल ई. मी जेव्हा ह्या बद्दल शोधलं ऑनलाईन कि गुढघ्यांची शस्त्रक्रिया झाल्यावर काही काळजी घ्यायची तेव्हा ह्या बद्दल साधं सुतवाच्य देखील कोणी केलं नव्हतं. एकतर गुढघे दुखी म्हणजे वयाचं आधीच झुकतं माप आणि त्यात कधी नव्हे ती परावलंबितता, त्यात मानसिक + शारीरिक दुखणं ज्यात गोळ्या अगदी किंचित सहभाग दर्शवतात, मग अश्यावेळी माझ्या मते अजून एक व्यक्ती जो ती उरलेली महत्वाची जागा भरायला बहूमुल्य मदत करेल ती हवीच, १०० टक्के. अर्थात हे सर्व प्रकारच्या शास्त्रक्रिये नंतर अत्यावश्यकच आहे पण उतारवयात जास्त गरजेचं आहे हे मला जाणवलं. मी हे माझ्या डॉक्टर मित्रांमार्फत सांगण्याचा प्रयन्त नक्की करेन आणि मला खात्री आहे कि ह्या आधुनिक अॅलोपॅथी डॉक्टर्स ना रुचेल / पटेल, आणि असं काही तरी लवकरच बघायला देखील मिळेल (Allopathy + medicines + physiotherapy + cuddle therapy / touch therapy etc. combo) आणि माझे प्रिय आजीआजोबा पट्टकिनी त्यांच्या पायावर पुन्हा उभे राहतील, भक्कम...
शनिवार, २७ ऑगस्ट, २०२२
एक अविभाज्य घटक
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा