शनिवार, १७ सप्टेंबर, २०२२

उंची

सुप्रसिद्ध लेखिका आणि एक उच्चपदस्थ व्यक्तिमत्व आदरणीय सुधा मुर्तिंजींच्या हातून पेरले गेलेले शब्द मला फार भावतात अगदी मनाला भिडतात म्हटलं तरी हरकत नाही. त्याची अनेक कारणे आहेत, जसे कि त्यांची विविध भाषेवरची पकड, प्रेम, अगाध ज्ञान आणि  छोट्याश्या कथा, बोधपर गोष्टी, अनुभवातून निर्माण झालेल्या, निदर्शनास आलेल्या किंवा टिपलेल्या . मी त्यांची बहुतांशी सगळीच पुस्तके, वांग्मय वाचले आहेत, चर्चा मनोभावे ऐकल्या आहेत. त्यांनी एवढ्यातच एक पोस्ट लिहिली होती सौंदर्याबद्दल. त्या पोस्ट मधे सौंदर्याचे विविध पैलू मांडण्यात आले होते जसे कि रंग, रूप, उंची, हुशारी, हुद्दा, शिक्षण आणि असे अनेक. उंची, अर्थात मी वैद्य किंवा डॉक्टर नाही त्यामुळे एखाद्याची उंची वाढण्यामागे, वाढण्याची असंख्य कारणे मला ठाऊक नाहीत. पण ढोबळ मानाने बघितलं तर अनुवंशिकता, डीएनए, संप्रेरक, शारीरिक हालचाली, पौष्टिक आहार असे असावेत. बऱ्याच जणांना शारीरिक उंची कमी असल्याचा न्यूनगंड असतो. काही जण ती शारीरिक उंची वाढवण्याचा अथक प्रयत्न करतात, यशस्वी होतात, काही नाही. उंची हि फक्त शारीरिक नसतेच. प्रत्येकजण आपल्या अगाध ज्ञानाने, कोणी विविध उच्चांक गाठून, जबरदस्त गूण मिळवून, चांगली नोकरी मिळवून म्हणजेच स्वतःच्या पायावर उभे राहून किंवा सिद्ध करून, सरळ मार्गी राहून, नेहेमी पुढे मार्गक्रमणा करून, विविध टप्पे गाठून कोणालाही दुखावता, सामाजिक कार्य करून, एक चांगली व्यक्ती म्हणून, जमिनीवर पाय घट्ट रोवून टिकवून उंची गाठतांना नजरेस पडतात. त्यामुळे जे आपल्या हातात नाही त्यावर विचार करण्यापेक्षा आहे ते बघा आणि पुढे व्हा, थांबू / थबकू नकाच कधीही. उंची हा एक भाग आहे फक्त, त्यापेक्षा बरेच काही आकाश गाठायचे आहे. तुम्ही ठरवा तुमची उंची किती ते. कृपया कोणालाही त्याच्या उंची किंवा दुसऱ्या कुठल्याही उणिवांची कळत /नकळत जाणीव होऊन देऊ नका. कारण . प्रत्येकाच्या डोक्यावरचं आकाश वेगळं असतं, जरी आपल्याला सारखंच दिसतं असलं तरी, . तुम्ही काय करता आहात त्या व्यक्तीला किंवा समाजाला हिरीरीने मदत पुढे जाण्यास? नाही ना? मग मागे तरी ओढू नका.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...