जेव्हा कधी माझ्या स्वयंपाकाच्या मावशी सुट्टी घ्यायच्या तेव्हा किंवा बरेचदा मस्त प्लॅन करून आम्ही घरी पुरी-भाजी किंवा छोले-पुरी चा बेत आखायचो. माझी लेकरं लहान होती तेव्हा मला अजूनही आठवतं कि माझा लेक आवर्जून प्रत्येक पुरी घेण्यासाठी डायनींग टेबल वरून उठून येत असे स्वयंपाक घरात. "अरे असं पानावरुन उठू नये जेवतांना...." इति मी, पण छे तो ऐकेल तर कसलं, यायचाच. मला उर भरून आल्यासारखं वाटायचं, इतक्या लहान वयात माझी एवढी काळजी, मोठं झाल्यावर तर अजून घेईल ई. मला आधी काही कारण समजायचंच नाही. शिवाय त्याला गरम पुरी खायला देखील वेळ लागायचा. म्हटलं काय गोम आहे? तेव्हा समजलं कि सर्वप्रथम महाराज आधी पुरीच्या वरचा पापुद्रा यथेच्छ फस्त करतात आणि मग बाकीची पुरी. आणि त्याला टम्म फ़ुगलेलीच पुरी हवी असायची. जर पुरी फुगली नाही तर पठ्ठा शांतपणे माझ्या शेजारी उभं राहून व्यवस्थित सूचना द्यायचा, पुरी फुगवण्यासाठी मला. तेच फुलक्यांचं पण, गरम गरम फुलके करून जर मी वाढण्याचा घाट घातला तर महाराज हजर माझ्या शेजारी. आज मावशी भाकरी करत होत्या, ती टम्म फुगलेली बघून हे सगळं तर आठवलं, कडा ओल्या झाल्या कारण आता हा पठ्ठा वसतिगृहात थंड पुऱ्या खातो. अजून एक विचार मनाला शिवून गेला म्हणून हा पंक्ती प्रपंच, पुरी, फुलका, भाकरी सगळे टम्म फ़ुगलेलेच हवेत सर्वांनाच, पण बायको, मुलगी किंवा इतर कोणीही मात्र फुगलेले चालत नाहीतच, असं का? फुगलेले आवडतात मग सगळेच फुगलेले आवडले पाहिजेत ना? असो, हे वाक्य मावशींना ऐकवलं तर त्या फक्त हसून लोळल्या नाहीत, वा वा, "ती" च्या फुगण्याच्या स्वभावामुळे आजचा दिवस फारच उत्साहात सुरु झाला. गणपती बाप्पा मोरया.
रविवार, ४ सप्टेंबर, २०२२
फुगलेली "ती"
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
Dr. Preeti, you have hit the nail on the head. Every bit of the initial part regaring puris and phulkas is so true..and very nostalgic as well...
उत्तर द्याहटवाAbout the latter part..who says that 'phuglelya' wives and other 'phugleli' people are not appreciated?? Of course they are as they should be!!
All in all, a hilarious and such a nostlgia tickling write up
Thank you so much for your immediate reply, as always awesome and from the heart. Really appreciate it. As you know, whatever pops up in front of me, I try to write, this is me and this is how I look at it. Tx again.
हटवा