माझं घट्ट प्रेम आहे होमिओप्याथी वर. त्यामुळे देखील कदाचित मला इतक्या वर्षात एक लक्षात आलं आहे कि प्रत्येक होमिओप्याथी डॉक्टरचा एका औषधावर प्रचंड विश्वास असतो, फेथ म्हणावं हवं तर. कि हे एक औषध दिलं किंवा त्या पेशंट नी घेतलं कि तो बरा होणारच. त्याच्या शिवाय देखील अजून बाकी लागणारी औषधं दिली जातात. पण तो एकावर विश्वास फार महत्वाचा. अगदी तस्सेच एक पत्रिका बघणारे दिग्गज काका होते ते देखील प्रत्येकाला त्याच्या पत्रिके प्रमाणे उपचार सांगायचेच पण एक मंत्र प्रत्येकाला सांगायचेच मनापासून म्हणायला. अगदी त्याच प्रमाणे आता मला एक नवीन फेथ चं उदाहरण समोर उभं ठाकलं आहे. माझ्या घरच्या मावशींना समजावून सांगता सांगता मला घाम फुटतो आहे अक्षरशः. त्यांचा फेथ ह्या जागावेगळाच आहे. गोडलिंब सगळ्यात भरभरून घातला प्रत्येक पदार्थात म्हणजे तो चविष्ट होतोच हा दृढविश्वास आहे त्यांचा, बाकी काहीही कमी जास्त असणं शक्यच नाही मग. देवा. अगदी कोशिंबीर देखील नाही सोडत त्या. काय बोलावं सुचतच नाही. माझ्या घरी तरी कोशिंबिरीत गोडलिंब घालण्याची प्रथा नाहीच. त्यामुळे देखील असेल मला फार म्हणजे फार वेगळं वाटतंय. असो. जैसी जिसकी सोच.
रविवार, ४ सप्टेंबर, २०२२
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा