दिलों
में तुम अपनी
बेताबियाँ लेके चल रहे
हो
तोह जिंदा हो तुम
नज़र में ख़्वाबों की
बिजलियाँ लेके चल रहे
हो
तोह जिंदा हो तुम
जो अपनी आँखों में
हैरानियाँ लेके चल रहे
हो
तोह जिंदा हो तुम
दिलों में तुम अपनी
बेताबियाँ लेके चल रहे
हो
तोह जिंदा हो तुम.
"जिंदगी ना मिलेगी दोबारा" ह्या प्रसिद्ध चित्रपटात काही ओळी सादर केल्या आहेत एका दिग्गज कलाकाराने "जिंदा हो तुम ..." ह्या सदराखाली. तो चित्रपट बघतांना आणि त्यानंतर आजतागायत ह्या ओळींनी माझ्यावर खूप मोठी छाप पाडली आणि सोडली देखील. सातत्याने बदल म्हणजेच जीवन, किंबहुना सुखी जीवन. अगदी ह्या धर्तीवर मी जेव्हा जेव्हा विचार, चिंतन आणि मनन करते तेव्हा हे उलगडतं कि काही व्यक्तींना त्यांच्यावर अवलंबून असलेल्या बऱ्याच लोकांना उभं करायचं असतं, देखभाल करायची असते म्हणून त्यांना "जिंदा हो तुम ..." हे ब्रीद वाक्य वाटतं आणि ते त्यावर जगतात. काहींना खूप काही करून दाखवायचं असतं अगदी जगाच्या पातळीवर म्हणून, तर काहींना इतकं भरभरून प्रेम मिळतं त्याकरता त्यांना मनापासून पटतं "जिंदा हो तुम...". पण कदाचित काहींना शारीरिक दुखणं पिच्छाच सोडत नाही, इतक्या आकंठ प्रेमाने तो स्थानापन्न झालेला असतो, विराजमान असतो कि त्या वेदनांमुळे समजतं "जिंदा हो तुम ...". वेदना जर काही क्षण नाहीश्या झाल्या तर चाचपडून बघावं लागतं आणि खात्री करावी लागते कि नक्की आहोत ना जिवंत कि? कारण वेदनारहीत काही क्षण म्हणजे फुलपाखरासारखी अनुभुती येते आणि खात्रीच पटत नाही कि आहोत अजून. प्रेम असावं तर असं, सतत साथ देणारं, अर्धवट नाहीच. क्षणोक्षणी, पदोपदी जवळ असणारं, आयुष्याचा आमूलाग्र भागच होऊन राहिलेलं. प्रत्येकाच्या वाट्याला असं अनोखं प्रेम येत नाही पण ज्यांना मिळतं त्यांना पुढे वाटचाल तर करावी लागतेच, ते देखील स्मितहास्य ठेवून, ह्या प्रेमळ साथीदारासंगे. असे सातत्याचे प्रेमळ अहोभाग्य लाभलेल्या सर्वांसमोर मी नतमस्तक होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा