कालची संध्याकाळ एक पिटुकला बदल देऊन गेली. माझी लेक अगदी तय्यार बसली होती. मी घरात शिरता क्षणी हातात वाफाळता गवती चहा युक्त कप मिळाला आणि मोबाईल देखील. काही कळायच्या आत फर्मान सोडलं गेलं तुला काय मागवायचे आहे ते पट्टाकिनी सांग कारण आज मी फक्त जिलबी + फाफडा फस्त करणार आहे, मला अजिबात जेवण नक्को, रात्री. आणि तिने मागवलं पण तिच्या आवडीचे जिन्नस. बास. विषय संपला. काही मिनिटात हवं ते दारात उभं ठाकलं आणि ते तिने अत्यानंदाने मावशींना आणि मला देत आडवा हात मारलाच. उरलेली जिलबी मग शीतकपाटात स्थानापन्न झाली. सकाळी मी बाहेर काढली कारण मला संपूर्ण कल्पना होती कि न्याहारी दरम्यान पण खाणार आणि थंडगार चविष्ट लागणार नाही. आम्ही दोघी ब्रेकफास्ट करते वेळी मी पण एक तुकडा तोंडात टाकला आणि अहो आश्चर्यम् ती जिलबी टस-कि-मस झाली नव्हती, जैसे-थे होती, कडक आणि त्याच स्थितीत जशी काल संध्याकाळी ताजी असतांना होती. इतक्या भल्यामोठ्या वातानुकूलित यंत्रणेत राहून देखील रात्रभर तसूभर देखील फरक नाही, चवीत, खुसखुशीतपणा, कडकपणा, स्पर्श, ई. सगळं तस्संच, अहाहा च. ते बघून मग सहज मनात आलं कि सर्वत्र आपण माणसं अशी का टिकून राहू शकत नाही, म्हणजे आपल्या दररोजच्या कामात, व्यवहारात, नात्यात, संबंधात वगैरे. म्हणजे कितीही गोठलेल्या परिस्थितीतून जावं लागलं तरी बाहेर पडल्यावर पुन्हा संबंध जैसे थे. उदाहरणार्थ कामावर, नात्यात किंवा इतर वेळी बऱ्याचदा असं होतं कि कोणी तरी ओरडतं, रागावतं, अपमान देखील होतो, ताशेरे ओढले जातात, कधी जाणून बुजून तर कधी अनवधानाने, पण ती वेळ निघून गेल्यावर जिलबी सारखं आपल्या मुळ रूपात त्याच कडक पूर्वस्थितीत का परत यायचं नाही? ते काय म्हणतात ना "झालं गेलं गंगेला मिळालं", "रात गई बात गई" वगैरे. थोडीशी मेहेनत करावी लागेल कारण आपण सरतेशेवटी माणसं आहोत, पण जमेल असं वाटतंय. बघावं करवून, हळू हळू. जमल्यास जिलेबी सारखी गोड मधुर चव निर्माण होईल आपल्यात आणि नात्यात देखील. चला तर मग असा हा गोड सुमधुर स्वानुभव घेऊन बघुयात.
रविवार, १६ ऑक्टोबर, २०२२
गुणधर्म व वैशिष्ट्य
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा