बऱ्याच ठिकाणी सांबार ह्या सुप्रसिद्ध पदार्थाचे नाव असे का पडले ह्यामागची कारणे वाचनात आली आहेत आणि ती खूप आवडली देखील मला. माझ्या दृष्टीने आणि काही ओळखीच्या लोकांच्या सवयीकडे बघून मला सांबार म्हणजे एक संपूर्ण पाककृती / अन्नपदार्थच वाटतो कारण त्यात भरपूर प्रमाणात भाज्या घातल्या जातात, प्रथिने असतात आणि एकंदरीत भरमसाठ गुणधर्म असलेला चविष्ट पदार्थ आहे. सांबाराची कहाणी वाचायची असल्यास ह्या खाली दिलेल्या लिंक वर जा आणि तृप्त व्हा. दाक्षिणात्य पद्धतीने केलेल्या गरमागरम सांबाराबद्दल लिहिण्याची, वाखाणण्याची ताकद माझ्या लेखणीत नाही आणि करायला मी धजावणार पण नाही. मी फक्त ते नेहेमीच मंत्रमुग्ध होऊन ओरपते, बास.
https://www.slurrp.com/article/tried-this-maharashtrian-dal-that-may-have-inspired-sambar-1659258324220
एका प्रसिद्ध कवी, गीतकार, संगीतकाराने चढवलेला साज म्हणतो "नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगामेरी आवाज़ ही, पहचान है....". ह्या गाण्यामुळे नाही तर नवजात शिशुला, बाळाला, लहान मुलाला, घरच्या मोठ्यांना, विद्यार्थ्यांना किंवा कधीही कुठेही कोणालाही सरप्राईझ देतांना आपण डोळे झाकले तरी फक्त आवाजाकडे लक्ष देतो आणि ओळखतो. आवाज हि फार मोठी ओळख आहे माझ्या दृष्टीने, अगदी प्रत्येक क्षणी, क्षणोक्षणी. तो आवाज आपल्या कंठातून येतो आणि त्या घशाची काळजी घेणं अत्यावश्यक असतं सगळ्या अवयवांची घेतो तशी. भारतीय स्वयंपाकात तेल, तूप असे जिन्नस वापरून तय्यार केलेल्या स्निग्ध पदार्थांची रेलचेल असते. त्यामुळे दाक्षिणात्य मेदुवडा किंवा पंजाबी पराठा फस्त केल्यावर कडक मसालेदार चहा प्यावा, किंवा गरम पाणी अशी प्रथा आहे किंवा सांगितलं आणि आचरणात आणलं जातं सहसा. घरची मोठी मंडळी पण आवर्जून सांगतात.
अर्धशतकी टप्प्यावर मला अनेक गोष्टींची जाणीव नव्याने होते आहे आणि आज मला उमगलं कि मेदुवड्या सोबत सांबर का वाढला जातो, किंवा सांबार का आहे ह्या पाककृतीचा विशेष भाग? फक्त चटणी / चटण्या पुरेश्या होत्या ना? मग सांबरच का? वर नमूद केल्याप्रमाणे मेदुवडा कुरकुरीत, खुसखुशीत व्हावा म्हणून त्यात काही जण सोडा घालतात, तर काही अजून काही पद्धतीने ते वड्याचे पीठ भिजवतात. सरतेशेवटी तो तेलात तळलेला पदार्थ मग तो आवडीने खाल्यावर घश्यावर परिणाम होऊ नये म्हणून हि क्लुप्ती खरंतर शोधून काढण्यात आली होती, आहे. त्यामुळे ह्यापुढे मनसोक्त आनंद घ्या, हवे तेवढे प्रमाणात वडे खा, पण मग सर्वगुणसंपन्न सांबार त्यावर प्यायला विसरू नका. तुमची ओळख = घसा, आवाज ई. शाबूत राहिल खात्रीपूर्वक हो. सो "मस्त खा आणि स्वस्थ राहा" असे "आम्ही सारे खवैये" मधे आवर्जून सांगतात प्रत्येक एपिसोड च्या समारोपाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा