तर हि २४ वर्षांपूर्वीची हि कथा आहे. कथा नाही स्वानुभवच तो. तर १९९८ साली माझं वास्तव्य हैदराबादेत होतं. मी त्यावेळी पदव्युत्तर अभ्यासक्रम करत होते आणि शिवाय अर्धवेळ नोकरी देखील. पण हैद्राबाद हे माझं गाव नसल्यामुळे मला वसतीगृहात राहावं लागलं. उत्कृष्ट दुचाकी चालवायला येत होती, पण त्या वेळी मात्र मी ६-८ चाकी भली मोठी बस पसंद केली. दररोज माझी पदयात्रा जवळपास ८-१० किमी होत असे, जास्त पण कमी नाही. फक्त स्वयंपाक करावा लागत नव्हता पण बाकी कामांची यादी भली मोठी होती. कामं+अभ्यास+नोकरी करून सावकाश चालत बसथांबा गाठणं परवडत नसे. त्यामुळे वायुवेगाने जायचं-यायचं. असा हा दिनक्रम १८ महिने सलग सुरु होता. वजन आटोक्यात राहण्याशिवाय रस्त्याशी गप्पा, पायांचे आभार आणि "गुड-डे" बिस्किटांची न्याहारी मानत दिवस सरत राहिले. त्या माझ्या संपूर्ण वास्तव्यात भरभक्कम साथ मिळाली ती माझ्या एका शिक्षकाची आणि त्यांच्या मॅडमची. त्यांना काही कामानिमित्य भेटायला म्हणून माझे आई-वडिल देखील आले होते एकदा. तर ह्या अश्या माझ्या दररोजच्या दोस्ताला आज पुन्हा एकदा २२ एक वर्षांनी पुन्हा भेटण्याचा योग आला मला आज. अर्थात ह्या आधी धावती भेट झाली होती पण आज भावनांसोबत, जाणिवांसोबत आणि आठवणींसोबत आगळी-वेगळी अशी होती ती भेट. अक्षरशः त्याच्या समोर नातमस्तक व्हावं अशी ती. २२ वर्ष हा काही कमी कालावधी नाहीच. त्यात माझे पाय पुरते गेले पण प्रचंड मोठी आठवण, स्मृती आणि स्फूर्ती, समाधान देऊन गेले. स्वप्नवत वाटतंय सर्व, माझे पाय ज्या रस्त्यावरुन चालत होते, ज्याने १८ महिने सलग माझ्या पायांना वाट दाखवली त्यांना शतशः धन्यवाद. आणि आज त्याच रस्त्यावरून मी माझ्या चारचाकीतून जातांना डोळे भरून आले, कधीही म्हणजे कधीही यत्किंचित शिवलं देखील नव्हतं तेव्हा कि मी अशी १० पावलांवर स्थलांतरित होईन आणि चारचाकी घेऊन मिरवीन टोकं आहेत दोन्ही पण माझीच नाही का? "अशी पावले येति आणिक स्मृती ठेवुनी जाती". त्यावेळी करून घेतलं, पायांनां प्रचंड बळ / ताकद दिली, तेव्हा जास्त गरजेची होती त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. आज पासून पुढे तुझ्या हिशोबानुसार ताकद कायम टिकून ठेव, नवनवीन दोस्ती / आठवणी घडवून आण एवढी प्रार्थना.
बुधवार, २६ ऑक्टोबर, २०२२
तो पदस्पर्श
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा