माझं कॉलेज जरा लवकर सकाळी सुरु होत असल्यामुळे रस्त्यावर प्रचंड प्रमाणात कष्टकरी नजरेस पडतात, कोणी व्यायाम करतं, कोणी धावतं, कोणी वायुवेगाने किंवा जमेल तस्स चालतं आणि इतर बरेच. प्रत्येकाकडे मात्र एक साम्य आढळून आलं. एक दिशादर्शक यंत्र त्यांच्या पुढे पुढे चालत, पळत, धावत असतं. मग मला विचार पडला कुठलेही वय असो, स्त्री / मुलगी/ मुलगा / पुरुष कोणीही म्हणजे कोणीही हे यंत्र प्रत्येकाकडे अग्रगणी का? इतकं महत्व का त्याला? कोण नक्की व्यायाम करतंय? आणि काय, चमत्कार / साक्षात्कार झाला आज, मला सापडलं हो उत्तर, अगदी चपराख असं ते उत्तर. हे जे दिशादर्शक आहे ना ते इतरांसाठी इतके कष्ट घेतं असतं दिवस रात्र सदोदित कार्य चालूच, अथक प्रयत्न आणि कुठलीही विश्रांती म्हणून ठाऊक नाहीच. त्याला बिचाऱ्याला शांतता, स्तभदता, आराम वगैरे माहित नाही, खिजगणतीत नाहीच त्याच्या. अश्या व्यक्तिमत्वाला मग दररोज सकाळी न चुकता व्यायाम, ताजी हवा, भटकंती ई. नको? अतिशय गरजेची आहे, तरच तो पुढचा दिवस रात्र काम करेल ना? त्यामुळे हे सगळे मानवजीव ह्या त्यांच्या दिशादर्शकाला अग्रगणी ठेवतात, आवर्जून भ्रमंती करायला न चुकता घेऊन जातात, म्हणजे एका दगडात दोन पक्षी हो, त्या दिशादर्शकाला नेणं पण आणि त्या निमित्याने स्वतः चालणं पण, कित्ती म्हणजे कित्ती तो सुविचार आणि तो देखील दुसऱ्यासाठी, आई गं, डॊळे पाणावले माझे पट्टाकिनी. मी नाही जात कधी व्यायामाला त्यामुळे मी हे अनुभवलं नाही पण नजरेस पडलं आणि शब्दात पेरण्याची गरज भासली.
सोमवार, २ जानेवारी, २०२३
मोबाईलला सफर
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा