माझ्या विश्वविद्यापीठाच्या परिसरात अनेक संस्था आहेत त्यात एक वैद्यकिय महाविद्यालय देखील आहे. वैद्यकिय महाविद्यालय म्हणजे भलं मोठं रुग्णालय देखील आलंच. रुग्णालय असल्यामुळे दरताशी महानगरपालिकेने बस सुविधा दिली आहे. ह्या बस सुविधेमुळे असंख्य रुग्णांना नाही तर, कर्मचाऱ्यांना खूप सुविधा झाली आहे. मला एक भ्रम होता कि बस सुविधा हे फक्त अगदी गरजू लोक वापरतात. पण काही दिवसांपूर्वी सलग बरेच दिवस एक डोळ्यांना अचंबित करणारा प्रसंग घडला. बरोबर ८ वाजता सकाळी एक बस पोचते रुग्णालयात. त्यातून तांत्रिकी महाविद्यालयाचे काही विद्यार्थी उतरले. तांत्रिकी महाविद्यालय ८.३० वाजता सुरु होते आणि बऱ्याचदा विद्यार्थी हा उशिरा येणारा असतो. आणि त्यातून वातानुकूलित यंत्रणा वगैरे काहीही नसतांना, कुठलीही सोयी सुविधा नसतांना ह्या जमान्यातले विद्यार्थी अश्या साध्या बसने येतात म्हणजे महद आश्चर्यच. ८ वाजता पोचायचं म्हणजे त्याआधी अती लवकर उठावं लागतं, मस्त तय्यार होणं, डब्बा आणि ह्या सर्वांकरता लागणारी स्वयं प्रेरणा ई. म्हणजे कमाल आहे. हे विद्यार्थी जे बस ने प्रवास करतात, वेळेवर दररोज, ह्या सुरवातीच्या अभियांत्रिकी दिवसात म्हणजे आता पुढे कदाचित काहीच बघायची गरज नाहीच. हि लागलेली शिस्त, बाणलेली म्हणा खरं तर आता नोकरी व्यवसायात देखील नक्कीच कामी येणार म्हणजे येणार. वेळेआधी कामं होणार, अभ्यास होणार आणि बरेच काही. माझ्या दृष्टीने ह्या अश्या शिस्तबद्ध विद्यार्थ्यांना जे वेळेचं महत्व ओळखतात, अवाच्यासव्वा खर्च टाळतात अश्यांना पुढे कधी वेळेचं व्यवस्थापन करण्याची गरज पडणार नाही, त्यामुळे ताण सुद्धा बहुतांशी जाणवणार नाही त्यामुळे सर्व सुरळीत होईल हे नक्की. अश्या विद्यार्थ्यांना कुठलीही परीक्षा देण्याची गरज पडू नये कारण त्यांनी आधीच अश्या अनेक परीक्षा पार पाडल्या आहेत. माझ्या दृष्टीने ह्या विद्यार्थी मित्रांनी आधिच खूप जिंकलं आहे, त्यामुळे आता छोट्या मोठ्या आव्हानांना ते तय्यार आहेत हे सातत्यानं केलेल्या कृतीतून सिद्ध झालंय. बाकी विद्यार्थ्यांनी आणि उशीर करणाऱ्यांनी खूप शिकण्यासारखं आहे ह्यातून.
शनिवार, १४ जानेवारी, २०२३
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा