एवढ्यातच मी एका हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. अगदी समजायला लागल्यापासून मी माझ्या घरी संक्रांतीचं, चैत्रगौरीचं, श्रावण शुक्रवारचं आणि इतर असे अनेक हळदी-कुंकू समारंभ बघितले, भाग घेतला आणि आयोजित देखील केले. आधी बहुतांशी सर्वजणी घरी असायच्या त्यामुळे संक्रांतीच्या दिवशीपासून ते रथ सप्तमीपर्यंत दररोज कोणा ना कोणाकडे असायचंच हळदी-कुंकू, शेजारी पाजारी, नातेवाईकांकडे आणि इतर ठिकाणी. त्यावेळी तिळगुळ लाडू, वड्या आणि पोळ्या फक्त घरी तय्यार केल्या जायच्या आणि ते देखील वर्षातून एकदा, गल्लीबोळातल्या पिटुकल्या दुकानात वर्षभर नाही. त्यामुळे वाट बघितली जायची त्या स्वादिष्ट आणि पौष्टिक वड्यांची. अगदी थोड्या काळ खायला मिळत असतं आणि त्यात आ'म्ही सारे खवय्ये" असल्यामुळे कुठलीही लाज लज्जा नाहीच, "आने दो" ह्या पद्धतीने भरपूर, मनसोक्त, यथेच्छ फडशा पाडला जायचा तिळगुळाचा. आई सोबत माझं पालूपद नेहेमीच असायचं त्यामुळे प्रचंड मज्जा यायची. प्रत्येक घर, पद्धती अतिशय वेगळ्या, त्यामुळे खूप रंगबिरंगी तिळगुळ चाखायला मिळायचा. मज्जा काही औरच होती ती, शब्दात कधीच बांधता येणार नाहीच. सध्याची स्थिती ३६० अंश बदलली आहे. बहुतांशी सगळ्याचजणी घराबाहेर, ३६५ दिवस दारोदारी हर तर्हेचा तिळगुळ उपलब्ध आणि उपलब्ध म्हणून सेवन त्यामुळे अप्रूप राहिलंच नाही आहे ह्या वड्या / लाडवांबद्दल सर्वसाधारणपणे. ऑफिस असल्यामुळे फक्त उपलब्ध असलेल्या दोन रविवारीच हळदीकुंकू, त्यामुळे देखील सर्वांच्या घरी दिलेला (विकतचा बहुतांशी) तिळगुळ खाता येत नाही. ह्या अश्या असंख्य कारणांमुळे असेल कदाचित एका गडगंज, अफाट श्रीमंत असलेल्या एका जणींनी मला हळदीकुंकू दिल्यावर काहीतरी हातात ठेवलं,पण गप्पांच्या नादात मी काही लक्ष दिलं नाही, कारण गप्पा जास्त महत्वाच्या वाटल्या मला, काही क्षण भरच्या. नंतर बघते तर काय माझ्या हातात फक्त तीळ होते, चार दाणे. म्हटलं काय? माझ्या चार डोळ्यांनी पुन्हा एकदा, अनेकदा बघितले आणि तिला गाठलेच मी, म्हटलं अगं हे काय दिलंस मला? "तिळगुळ, आमच्यात असंच देतात हो " इति ती. मी अवाक, कित्ती साधं आणि सोप्पं ना. आणा बाजारातून आणि वाटा, धुवा, वाळवा, भाजा, कुटा, मोजा, शिजवा आणि वळायला नक्कोच मुळी, तरी देखील "सुगरण". कित्ती सोप्पं पौष्टिक खाद्य, मधुमेह वगैरेची चिंताच नको.
मंगळवार, १७ जानेवारी, २०२३
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा