धावपळ, शर्यत आणि शीघ्रगती हा तर सर्वश्रुत जगमान्य नियम आहे आणि सर्वजण अगदी हिरीरीने ह्यात भाग घेतात. किंबहुना अनेक जण कळत, नकळत ह्यात सहभागी होतात. काही जणांना तर अश्या शर्यतीच दिसतात फक्त. किंवा इतरांना ह्या शर्यतीत सहभागी करणं, मुद्दाम टाकणं हे अनेकांचे नित्यनियमाने काम. असंख्य जण फक्त पुढे मार्गक्रमण करतं असतात कोणाचीही वाट न बघता. हे झालं एक. दुसरं म्हणजे मला शाळेच्या धावण्याच्या आणि सायकल चालवण्याच्या शर्यती आठवल्या. त्यात दोन प्रकार असायचे. एक म्हणजे जो जोरदार सायकल चालवून किंवा धावून सर्वप्रथम येतो आणि दुसरी शर्यत म्हणजे सावकाश चालणे / धावणे शर्यत. सावकाश सायकल चालवणाऱ्याला किंवा धावणाऱ्याला बक्षीस मिळते. दोन्ही शर्यती फार अवघड आहेत, जोरदार गतीने धावणं जितकं कठिण त्या पेक्षा कणभर जास्त कठिण सावकाश धावणं / चालणं. आमच्या सोसायटीत ठिकठिकाणी गतीरोधक बांधले आहेत. बरीच छोटी मुलं आणि जेष्ठ असतात सोसायटीत, त्यामुळे प्रत्येक गाडी जाता येता सावकाश कमी गतीने जा-ये करण्यासाठी म्हणून. त्या गतिरोधकावरून हळूच सावकाश गाडी काढणं म्हणजे एक खास कलाच आहे. प्रत्येकाला जमणं अशक्य. सरळ मार्गावरून गाडी चालवणं आणि अश्या उंच सखल भागावरुन गाडी काढणं तज्ज्ञांचं काम आहे. तज्ज्ञ फक्त गाडी चालवणारा नाही तर दुसऱ्याचा विचार करणारा पण हवा. दुसऱ्याचा विचार असेल तर कृती तशीच होते. गाडी भरपूर गतीने तर सगळेच चालवतात पण गाडी न बंद पडता सावकाश चालवणं म्हणजे सर्व पद्धतीचे कौशल्य पणाला लागते. आज एका रिक्षातून आम्ही बाहेर जात होतो, तो रिक्षेवाला कदाचित आमच्या सोसायटीत पहिल्यांदाच आला होता. त्यात अनुभवांवरून न शिकणारा, डोळस पणे काम न करणारा किंवा कदाचित कामावर लक्ष नसणारा किंवा घाई असणारा. ४-५ गतीरोधक आहेत सोसायटीत. एकावरून रिक्षा उडवणे समजू शकते. पण बाकी गतिरोधकांचं काय? दिसतं नव्हते का मुद्दाम? त्याचं त्याच्यापाशी. पण हे नक्की कि आपल्या कामावर प्रेम असणे, त्या रिक्षाची किंवा कामाची काळजी असणे, दुसऱ्याची कदर करणे, आणि सावकाश गतीने मार्गक्रमण करणे अत्यावश्यक आहे, नेहेमीच.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा